माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनो, अन्नत्याग, नवस, पायी वारी करु नका! : धनंजय मुंडे

Social Justice Minister Dhananjay Munde emotional appeal from Corona Ward
Social Justice Minister Dhananjay Munde emotional appeal from Corona Ward

पुणे : ''माझ्यावर प्रेम करणाऱ्या कोणालाही त्रास झालेला मला बरे वाटणार नाही. त्यामुळे कोणीही अन्नत्याग, नवस, पायी वारी करु नका,'' असे भावनिक आवाहन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी थेट कोरोना वॉर्डमधून सर्व समर्थकांना फेसबुकच्या माध्यमातून केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
 

मुंडे हे सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी, यासाठी राज्यभरातून त्यांचे समर्थक प्रार्थना, नवस, अन्नत्याग, पायी वाऱ्या करत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंडे यांनी कार्यकर्त्यांना हे भावनिक आवाहन केले आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या आवाहनाची पोस्ट धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावरून केली आहे. दरम्यान, मुंडे हे कोरोनातून लवकरात लवकर बरे व्हावेत, यासाठी अनेकजण मुंबईकडे धाव घेऊ लागले आहेत. आपणा सर्वांचे हे प्रेम पाहून त्यांचे आपल्यावरील ऋण वाढतच जात असल्याचे मुंडे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितली आरोग्यासाठी पंचसूत्री; वाचा सविस्तर

आपल्या सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन येणार येणार आहे. त्यामुळे कोणीही पायी वारी करणे, अन्नत्याग - उपवास करणे,  स्वतःला त्रास किंवा इजा करणारे प्रयत्न करू नयेत.आपल्यावर प्रेम करणाऱ्यांना असा त्रास झालेला मला कसा बरा वाटेल,  असा सवालही त्यांनी केला आहे.

कोरोनानंतर आता शहरांसाठी ट्विन सिटी हा उत्तम पर्याय ठरेल; वाचा खासदार अमोल कोल्हे यांची मतं

मुंडे यांना ११ जूनला (गुरुवारी) रात्री कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर झपाट्याने ही बातमी राज्यभर पसरली. त्यामुळे राज्यभरातून त्यांच्या समर्थक व चाहत्यांकडून सोशल मीडियासह विविध माध्यमातून प्रार्थना केल्या जाऊ लागल्या आहेत.

कोणीही कसलाही त्रास करून न घेता, आहे त्याच ठिकाणी राहून स्वतःचे व कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करावे आणि एकमेकांची कोरोनापासून काळजी घ्यावी, हेच आपल्यासाठी सदिच्छा व प्रार्थनांचे काम करतील असेही शेवटी  मुंडे यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com