‘फुकट’ योजनांपासून सावधान!

Free-Scheme
Free-Scheme

भवानीनगर - तुम्हाला सोशल मीडियावर प्रधानमंत्री फ्री सायकल योजना, १२ हजार रुपये धनादेशाची प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, बालिका समृद्धी योजना, युवा कल्याण योजना या नावाने काही मेसेज आल्यास फसू नका... ते सरकारी संदेश नसून, मल्टी लेव्हल मार्केटिंगमधील फसवणुकीचा प्रकार आहे!

आतापर्यंत ५, १० कोटी पौंडाचे बक्षीस लागले आहे, अशी मेल पाठवून लोकांची फसवणूक करणाऱ्या नायजेरियन फ्रॉडचा नवा अवतार देशातच सुरू झाला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे व त्यांच्या लोकप्रियतेचा आधार घेत प्रधानमंत्री मोफत योजनांच्या नावाने पाऊस पाडून सध्या हा वेगळाच फ्रॉड सुरू झाला आहे.  प्रधानमंत्री आवास योजना ही नव्याने घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सरकारी योजना सुरू आहे, त्यामध्ये निमशहरी व शहरी भागात २.६७ लाखांपर्यंत अनुदान मिळते. त्याचा आधार घेऊन सध्या व्हॉट्‌सॲपवर १२ हजार रुपये फ्री चेक देणारी प्रधानमंत्री आवास योजनेची पोस्ट व्हायरल झाली आहे.

तशीच प्रधानमंत्री बालिका समृद्धी योजनेचीही गत आहे. यामध्ये १ ते १८ वयांतील मुलींसाठी १० हजार रुपयांचा चेक दिला जात असल्याचे नमूद केले असून, प्रधानमंत्री युवा कल्याण योजनेत युवकांना सरकार २५ हजार रुपये देणार आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेत १२ हजार रुपये दिले जाणार असून, त्यासाठी ३१ ऑगस्ट, ५ सप्टेंबर अशी वेगवेगळी मुदत दिली जात आहे.  या सर्वांची पद्धत एकसारखीच असून, यामध्ये नावनोंदणी सुरवातीस केल्यानंतर तुमच्या १० ग्रुपवर ती पोस्ट पाठवायला सांगितली जाते. आपोआप ही पोस्ट व्हायरल होत जाते. त्यात अमुक एक रक्कम भरण्याची गळ घातली जाते. त्यातून फसवणूक होण्याचा धोका असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com