"डीपी'साठी काय पण... 

सुवर्णा चव्हाण 
बुधवार, 25 जानेवारी 2017

"तुम्ही माझे आहात, मी तुमचा आहे'... असे संदेश असलेले कव्हर फोटो, पक्षाचे चिन्ह आणि प्रभाग क्रमांक असलेला डीपी (डिस्प्ले पिक्‍चर) सध्या फेसबुकवर झळकतोय. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर इच्छुकांनी फेसबुक, व्हॉट्‌सऍप आणि इन्स्टाग्रामवर प्रचाराला सुरवात केली आहे. फेसबुक व व्हॉट्‌सऍपवर इच्छुकांचा प्रचाराचा डीपी "फेमस' होत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि प्रचारासाठी इच्छुक हा फंडा वापरत असून, त्याच्यावर लाइक्‍सचा पाऊस पडत आहे. 

आपल्या फेसबुक अकाउंटवर आणि ऑफिशियल पेजवर असे "डीपी' इच्छुकांमार्फत अपलोड केले जात आहेत. त्यामुळे "डीपी'चा हा आगळावेगळा प्रचार मतदारांनाही आकर्षित करत आहे. या "डीपी'मधून स्वतःच्या प्रचारासह कोणती कामे केली जातील, याची आश्‍वासनेही दिली जात आहेत. फेसबुकवर या "डीपी'ची क्रेझ अधिक आहे. पांढरा शुभ्र कुर्ता आणि पक्षाचे उपरणे असा पेहराव करून काढलेला "डीपी' प्रत्येक इच्छुकाने आपला प्रोफाइल पिक्‍चर आणि कव्हर फोटो म्हणून ठेवला आहे. 

इच्छुक दररोज नव्या ढंगात आणि नव्या प्रचार संदेशातून स्वतःची प्रसिद्धी करत आहेत. खास पोझमधले हे "डीपी' आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असून, त्यांच्या फेसबुकवर पेजवर असे "डीपी' आणि फोटो प्रत्येक क्षणाला अपलोड केले जात आहेत. प्रचाराची क्षणचित्रे, विकासकामांची आश्‍वासने आणि वेगळ्या पद्धतीने केलेल्या प्रचाराची छायाचित्रे प्रत्येकाच्या फेसबुक वॉलवर दिसून येत आहेत, तर व्हॉट्‌सऍपवरही प्रचाराचा "डीपी' इच्छुकांनी ठेवला आहे. 

विशेषतः महिला इच्छुकांनी रंगबिरंगी साड्यांमध्ये, उपरणे, पक्षाचे चिन्ह आणि संदेश अशा गोष्टींचा समावेश करून खास "डीपी' अपलोड केले आहेत. त्यालाही पसंती मिळत आहे. त्यामुळे महिला असो वा पुरुष प्रत्येकाच्या फेसबुक वॉलवर प्रचाराचे "डीपी' फेमस झाले असून, हा प्रचाराचा नवा ट्रेंड नेटिझन्सही फॉलो करत आहेत.

Web Title: Social media news talk