सामाजिक संदेशासाठी मायलेकींचा ४८६ किमी सायकल प्रवास

मायलेकींच्या या कर्तृत्वाचे महिलादिनाच्या पार्श्वभुमीवर कौतुक होत आहे.
Cycle Travel
Cycle TravelSakal

कोरेगाव भीमा : भारत की खोज या संकल्पनेतून विविध सामाजिक संदेश देत पुण्यातील दोघी मायलेकींसह कुटूंबाने सायकलवर पुणे ते शिरपूर हा ४८६ किलोमीटरचा सायकल प्रवास अवघ्या चार दिवसांत पूर्ण करुन इतरांसमोर एक अनोखा आदर्श ठेवला आहे. मायलेकींच्या या कर्तृत्वाचे महिलादिनाच्या पार्श्वभुमीवर कौतुक होत आहे.

पुणे मार्केट यार्ड येथील राहणारे संगणक अभियंता राहूल शहा यांची पत्नी अंकीता राहूल शहा व त्यांची कन्या अनेरी शहा (वय ११) या दोघींनाही राहूल शहा यांच्याप्रमाणेच सायकलींगची मोठी आवड आहे.

जैन धर्मीयांमध्ये पवित्र तिर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या जैन शिरपूर येथील श्रीअंतरिक्षजी तीर्थ या ठिकाणी भेट देण्याची संकल्पना मनात घेवून या तिघांनीही "भारत की खोज" ह्या संकल्पनेतून ही सायकल यात्रा सामाजिक संदेश देत पुर्ण करण्याचे ठरवून ती २८ फेब्रुवारी दरम्यान यशस्वीपणे पुर्णही केली. या यात्रेसाठी अंकिता यांनी ‘हेल्थ इज वेल्थ’ तर अनेरीने खेलो इंडिया, स्टे अवे फ्रॉम गॅझेट्स तसेच राहूल यांनी रिस्पेक्ट सोल्जर्स, वुई आर प्राऊड ऑफ इंडियन आर्मी.. असे संदेश असलेल्या पाट्या लावून तिन्ही सायकल स्वारांनी हे संपूर्ण अंतर चार दिवसात पार केले.

राहूल आणि अंकिता यांनी गतवर्षी पुणे ते पंढरपूर तसेच अष्टविनायक सायकल यात्रा असेच वेगवेगळे सामाजिक संदेश देत पूर्ण केली असून अनेरीने ९ व्या वर्षी पुणे ते पंढरपूर तसेच पुणे ते गुजरात मधील धरमपूर अशा मोठ्या सायकल यात्रा पुर्ण केल्या आहेत.

रोज सुमारे १२० किलोमीटर प्रवास करुन व अहमदनगर, औरंगाबाद, लोणार येथे मुक्काम करून ही सफर पुर्ण करण्यात आली. या दरम्यान शिरूर येथे जैन मंदिर, नेवासा येथे पैस खांब, मोहिनीराज, सिंदखेड राजा तसेच जिजाऊ शृष्टी आणि लोणार सरोवरासही भेट दिली.

या प्रवासात गावागावात या मायलेकींच्या सायकलप्रवासाचे कौतुकासह स्वागत झाले. दरम्यान हे तिघेही ‘हेल्थ इज वेल्थ’, खेलो इंडिया, तसेच रिस्पेक्ट सोल्जर्स. असे संदेश द्यायला मात्र विसरले नाहीत. यावेळी अनेकांनी या कुटुंबाचा आदर्श घेत स्वास्थ्याची पूर्ण काळजी घेण्याचा निश्चयही बोलून दाखवला. या सायकलसफरीहून परतलेल्या या दोघी मायलेकी सायकलपटुंसह या कूटूंबाच्या कर्तृत्वाचे महीलादिनाच्या पार्श्वभुमीवर विविध स्तरातून कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com