विद्यापीठात समाजोपयोगी संशोधन व्हावे: डॉ. सत्य पाल सिंग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा १९ वा पदवीप्रदान समारंभ संपन्न

पुणे : आज विद्यापीठात जे संशोधन होते ते प्रयोगशाळांमध्येच सीमित राहते. विद्यापीठात समाजोपयोगी संशोधन व्हावे असे प्रतिपादन भारत सरकारच्या मानव संसाधन विकास (उच्च शिक्षण), जल संसाधन, नदी विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. सत्य पाल सिंग यांनी केले. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या १९ व्या पदवीप्रदान समारंभात ते प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे, प्र-कुलगुरू डॉ. विश्वजीत कदम, कुलसचिव जी. जयकुमार, परीक्षा विभागाचे नियंत्रक डॉ. विश्वास धापते सर्व विद्या शाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन आणि विद्या परिषदेचे सदस्य उपस्थित होते. या समारंभात 7338 विद्यार्थ्यांना पदवी, 90 विद्यार्थ्यांना पी.एचडी. आणि 50 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके प्रमुख पाहुणे, कुलपती आणि कुलगुरू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

डॉ. सत्य पाल सिंग म्हणाले, पी.एचडी. संपादन करणाऱ्यांची संख्या भारतात अधिक आहे. पण संशोधनाची गुणवत्ता हा चिंतेचा विषय आहे. केवळ पदोन्नती मिळविण्यासाठी प्राध्यापकांकडून संशोधन केले जाते शोधनिबंध प्रसिद्ध केले जातात ही खेदाची बाब आहे. सर्जनशीलता आणि नवनिर्मिती याचे दर्शन संशोधनातून घडले पाहिजे अशा प्रकारच्या गुणवत्तापूर्ण संशोधनाची मानसिकता निर्माण करण्याचे मोठे आव्हान विद्यापीठांसमोर आहे. आज इच्छा असूनही अनेकांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. उच्च शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत नेण्यासाठी खासगी विद्यापीठे महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी विद्यार्थ्यांना ध्येय आणि मूल्यांप्रती अढळ राहण्याचा संदेश दिला.

कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे विद्यापीठाचा अहवाल सादर करताना म्हणाले, संशोधन हा विद्यापीठाचा आत्मा आहे. अशी भावना ठेवून या विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण संशोधन केले तसेच स्पर्धेचे आणि काळाचे भान ठेवून सतत अद्ययावत राहण्याचा केलेला प्रयत्न, त्यामुळे देशातल्या नामवंत विश्वविद्यालयांमध्ये भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचा समावेश होतो. प्रा. राजेंद्र उत्तूरकर आणि डॉ. ज्योती मंडलिक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Web Title: Social science research should be done at the university says Dr Satya Pal Singh