सरबत विकून समाजसेवा करणारे वेद अन्‌ हर्ष (व्हिडिओ)

सरबत विकून समाजसेवा करणारे वेद अन्‌ हर्ष (व्हिडिओ)

पुणे - यंदा उन्हाळ्याच्या सुटीत वेद व हर्ष यांनी विलक्षण अनुभव घेतला. कुठल्याच मौजमजेच्या प्रसंगांपेक्षा समाजसेवेच्या या कामातून त्यांना आयुष्यभरासाठी उपयोगी पडणारी कौशल्ये मिळाली आहेत. आगळंवेगळं समाधान ही त्यांची भलीमोठी कमाई आहे.

आकुर्डीत राहणाऱ्या वेद स्वानंद थिटे व हर्ष अभय भडभडे यांनी उन्हाळ्यात जे केलं, त्याला तोड नाही. वेद म्हणाला, ‘‘रस्त्यात मला एक आजी-आजोबा दिसले. त्यांना चालताना त्रास होत होता. आईला ते सांगून विचारलं की, अशांसाठी मी काय करू शकतो? आई म्हणाली की, अशा आजी-आजोबांची काळजी लहान मुलांसारखी घ्यायला हवी. घरी सगळ्यांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं की, आम्ही दिलेले पैसे घेऊन तू एखाद्या वृद्धाश्रमात देणगी दिलीस तर तुला फारसं काही वाटणार नाही. तू स्वतः कष्ट करून पैसे कमव. आम्ही तेवढीच भर घालू. ते देणगी म्हणून देऊ.

वेदनं मग मामेभाऊ हर्षला हे सांगितलं आणि या दोघांनी वेदच्या घरासमोरच्या रस्त्यावर टेबल टाकून लिंबू व सरबत विकायला सुरवात केली. पाटीवर लिंबू व कोकम सरबत १० रुपये ग्लास, असं लिहिलं. हर्ष म्हणाला, ‘‘आम्ही ओरडून जाहिरात करायचो. ग्राहकांना सामाजिक कार्याची कल्पना द्यायचो. एका ताईनं ते फेसबुकवर टाकलं. 

शेजारच्या कुटुंबानं १०० रुपयांचं सरबत घेऊन ५०० रुपये दिले. उरलेल्या ४०० रुपयांमधून तिथले सफाई कामगार, माळी, कष्टाचं काम करणाऱ्यांना सरबत द्यायला सांगितलं. अशीच मदत आणखी काहींनी  केली.’’

सतरा-अठरा दिवसांमध्ये एक हजार रुपये कमावल्यावर या दोघांच्या आजी-आजोबांनी हजार-हजार रुपयांची भर त्यात घातली. एकूण जमलेल्या तीन हजार रुपयांमधून या दोघांनी घराजवळच्या मोनीबाबा वृद्धाश्रमाला ३० किलो गहू, २५ किलो तांदूळ व सहा किलो साखर व उरलेले पैसे देणगी म्हणून दिले. यातून नियोजन, हिशेब, जाहिरात, काहींकडून चांगली तर काहींकडून वाईट वागणूक मिळाली तरी निराश न होणं, जनसंपर्क वाढवणं वगैरे बरंच काही शिकले. कष्टांच्या पैशांतून समाजसेवेचा अनुभव व दुर्मीळ असं समाधान ही आयुष्यभरासाठी न संपणारी कमाई त्यांनी केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com