समाज कल्याण आयुक्तांकडून वसतिगृहाच्या इमारतींची पाहणी 

समाज कल्याण आयुक्तांकडून वसतिगृहाच्या इमारतींची पाहणी 

पुणे- येरवडा येथे समाज कल्याण विभागाच्या वतीने सुसज्ज वसतिगृहाचे बांधकाम करण्यात आले आहे.या वसतिगृहाची पाहणी राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी नुकतीच केली. 

सामाजिक न्याय भवन परिसरात हे वसतिगृह बांधण्यात आले असून एक हजार मुले-मुली राहतील एवढी त्याची क्षमता आहे. या इमारतीमधील युनिट तीन व चारचे बांधकाम पूर्ण झाले असून किरकोळ काम बाकी आहेत. काही दुरुस्त्या करण्याबरोबर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी काही बदल करणे आवश्‍यक असल्याचे डॉ. नारनवरे यांनी सांगितले. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर लवकरच बैठक घेण्याची सूचना त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सामाजिक न्याय विभागाने उभारलेल्या दोन वसतिगृह इमारतींची देखील त्यांनी पाहणी केली. बांधकामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. "बार्टी'चे महासंचालक धम्मज्योती गजभिये, सहआयुक्त भारत केंद्रे, उपायुक्त रवींद्र कदम पाटील, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहाय्यक आयुक्त संगीता डावखर, विद्यापीठाचे अभियंता आर. व्ही. पाटील, यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग व समाज कल्याण विभागाचे अधिकारी-कर्मचारी या वेळी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com