समाजकल्याण अंपग विभाग आयोजित स्पर्धेत अंधशाळेची बाजी

संदिप जगदाळे
शनिवार, 17 मार्च 2018

हडपसर (पुणे) : समाजकल्याण जि. प. अंपग विभागाअंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळेतील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतूक होत आहे.

बुध्दीबळ स्पर्धत 13 ते 19 वयोगटात पूर्णतः अंध गटात संकेत शर्मा हा प्रथम आला. तर 17 ते 21 या वयोगटात पूर्णतः अंध गटात संकेत सावळे प्रथम आला आणि याच वयोगटात अशंतः अंध गटात तोशीफ शेख याने तिसरा क्रमांक पटकावला.  21 ते 25 वयोगटात पूर्णतः अंध गटात देवदान गायकवाड प्रथम तर द्वितीय क्रमांक यश वाघ याने पटकावला. याच वयोगटात अंशतः अंध गटामध्ये स्वराज घुले यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. 

धावणे स्पर्धत 8 ते 12 वयोगटात पूर्णतः अंध गटात द्वितीय क्रमांक अर्थव काळे व तृतीय क्रमांक भाऊराव वैद्य याने पटकवला. तर अंशतः अंध गटात रोहित टकले याने प्रथम क्रमांक पटकावला. तर 13 ते 16 वयोगटात पूर्णतः अंध गटात प्रथम क्रमांक संकेत शर्मा तर तृतीय क्रमांक अविनाश शेंडगे याने पटकावला. याच वयोगटात अंशतः अंधमध्ये रोहित भरगुणे द्वितीय तर सागर जाधव याने तृतीय क्रमांक पटकावला. 17 ते 21 वयोगटात पूर्णता अंध गटामध्ये साबीर शेख प्रथम, अभिषेक जायभाय द्वितीय तर प्रणव मुरकुटे तृतीय आला. तर अंशतः अंध गटात तोशीफ शेख प्रथम, प्रथमेश बांदल द्वितीय तर मंथन चव्हाण तृतीय आला.

लांब उडी स्पर्धेत 13 ते 16 वयोगटात अंशतः अंध गटात रोहित भरगुणे प्रथम. पूर्णतः अंध गटात प्रणव मुरकुटे प्रथम तर अभिषेक जायभाय व प्रथमेश बांदल यांनी तृतीय क्रमांक पटकावला. 

गोळाफेक स्पर्धत 13 ते 16 वयोगटात रोहित भरगुणे प्रथम तर 17 ते 21 वयोगटात द्वितीय प्रथमेश बांदल याने क्रमांक पटकावला. तर बॅाल पासिंग स्पर्धेत 13 ते 16 वयोगटात भाउराव वैद्य क्रमांक याने द्वितीय क्रमांक पटकावला. 

यशस्वी स्पर्धकांचे प्रशासकीय अधिकारी कृष्णा शेवाळे, प्राचार्य चंद्रकांत भोसले यांनी अभिनंदन केले. तर प्रशिक्षक राजाराम जगताप, राजेंद्र सुतार, रंगनाथ गजरे, गणेश पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संस्थेचे सचिव महेंद्र पिसाळ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले. 

Web Title: social welfare department organised competition blind students success