पिंपळगावच्या नवदाम्पत्याचा लग्नात सामाजिक उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

मंचर  : लग्न समारंभात फेटे, सत्कार व मानपानाला फाटा देवून खर्चात बचत करून अनाथ मुले, धर्मशाळा, शैक्षणिक कार्य व किल्ले संवर्धनासाठी ८३ हजार रुपयांची रक्कम देण्यात आली. लग्न समारंभासाठी हजर असलेल्या पाहुण्यांना आंबा व जांभळाचे वृक्ष देण्यात आले.

पिंपळगाव - खडकी (ता. आंबेगाव) येथील  मनमोहन रभाजी पोखरकर व राधिका ज्ञानेश्वर दातखीळे या नवदाम्पत्याने विवाह प्रसंगी राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मंचर (ता. आंबेगाव) येथील जीवन मंगल कार्यालयात विवाह पार पडला. मंगल कार्यालयाच्या सजावटीमध्ये मेघडबरी, माता तुळजाभवानी मंदिर, शिवरायाची राजमुद्रा व भिंतीवर गडकिल्ल्याचे फोटो लावून गड किल्ले संवर्धनाचा संदेश दिला. डीजे न लावता ढोल –ताशा पथक व शाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पन्तु चंद्रकांत साठे यांनी दानपट्टा व तलवारबाजीची चित्तथरारक प्रत्याशिके सादर केली. कापडी पिशव्यांमधून वृक्ष वाटप करून पर्यावरण व प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला. किल्ले संवर्धनाची चित्रफीत वऱ्हाडी मंडळीना दाखवण्यात आली.

आंबेगाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या हस्ते पोखरकर व दातखिळे कुटुंबाच्या वतीने राजस्व फाऊंडेशन यांना ११ हजार रुपये, दुर्गवीर प्रतिष्टान यांना ११ हजार रुपये, जुन्नर येथील समाजसेवक अक्षय बोऱ्हाडे प्रतिष्टान यांना ११ हजार रुपये, पिंपळगाव खडकी येथील श्रीराम विद्यालय २५ हजार रुपये, आळंदी येथील श्रीराम देवालय धर्मशाळा २५ हजार रुपये अशा स्वरूपात देणग्या धनादेशाद्वारे देण्यात आल्या.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, बाबासाहेब आढळराव, अॅड. सुनील बांगर, चंद्रकांत साठे केशवानंद महाराज, माजी जिल्हा परिषद सदस्य मथाजी पोखरकर, सरपंच संगीता पोखरकर आदींनी शुभेच्छा दिल्या.

Web Title: Social Work of 83 thaosand rupees by Newly wedding in Pimpalgaon