नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी समाजसेवा हाच उपाय-येमुल गुरूजी

वृत्तसंस्था
गुरुवार, 14 जून 2018

औंध (पुणे) : आज मानवी जीवन धकाधकीचे बनले असून एखाद्या गोष्टीत अपयश आले की, माणसाला नैराश्य येते. परंतु, यश अपयश हे जीवनात येतच असते याचा सारासार विचार करून व अंधश्रद्धेला बळी न पडता आपण पुढे गेले पाहिजे. त्यावर मात करायची व समाजसेवा करत रहायचे यातून मनाला आधार मिळतो व  नैराश्यातून मानवी मन बाहेर पडू शकते  व हाच त्यावर उपाय असल्याचे मत ओम गुरूसेवा फाऊंडेशनचे रघूनाथ येमुल गुरूजी यांनी व्यक्त केले.

भैय्यू महाराज यांनी नुकतीच आपली जीवनयात्रा संपवली त्या पार्श्वभूमीवर गुरूजी आपले मत व्यक्त करताना बोलत होते. जगात सर्वत्र दु:ख आहे त्याचा सामना करण्यास आपण सत्कार्य, समाजसेवा व कला, क्रिडा यात मन रमवले तर आयुष्य सुखमय होते. परंतु आजकाल आपण लवकरच सुखी संपन्न व्हावे याचे स्वप्न पडतात व ते पूर्ण झाले नाही तर नैराश्य येते. सध्या शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक यांना आर्थिक, शैक्षणिक अपयश येत असल्याने होणाऱ्या आत्महत्या चिंताजनक आहेत. त्याचबरोबर एकाकी  राहणारे व्यक्ती, ज्येष्ठ मंडळी हे सुध्दा एकाकीपणात आत्महत्येचा मार्ग अवलंबतात.

यातून या सर्वांना बाहेर काढण्यासाठी  प्रयत्न होणे गरजेचे आहे. सक्षम मार्गदर्शन, कष्टांची जाणीव करून देणे व समस्येला न डगमगता यशापयशावर मात करण्यासाठी प्रयत्न करणे हे त्यांच्या मनावर बिंबवले गेले पाहिजे व नैराश्यापासून परावृत्त केले पाहिजे. त्यासाठी  अनाथ, अपंग,निराधार,विधवा यांची मदत करून त्यांना आधार दिला तर त्यांचा आशिर्वाद आपल्या जीवनात समाधान देणारा असतो. आज जगभरात  आत्महत्येचे प्रमाण वाढत असताना या आत्महत्या कशा रोखता येतील यावरही विचार व्हावा तसेच नैराश्य मुक्तीसाठी एखादा जागतिक दिन साजरा करावा म्हणजे यातून नैराश्य मुक्तीसाठी प्रयत्न होऊन जनतेला मार्गदर्शन करता येईल. यासाठी आम्ही  पुढाकार घेऊन अशा प्रकारे नैराश्य मुक्ती  दिनाची संकल्पना जगभरात  मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

Web Title: social work is a solution to outcome of depression said yemul guruji