शरद पवार यांनी मनाचा मोठेपणा दाखविला आणि तीन मंत्री घेऊन भेटायला आले......! 

मंगेश कोळपकर
Thursday, 9 July 2020

हमाल मापाडींच्या प्रश्नांसंदर्भात शरद पवार यांना पुणे दौऱयादरम्यान 25 जून रोजी आम्ही निवेदन दिले होते. त्यावेळी बैठक घेऊ, असे त्यांनी सांगितले होते. बैठक मुंबईत होईल, असा माझा अंदाज होता. परंतु, माझ्या नव्वदीचा विचार करून बैठक पुण्यात मार्केटयार्डात घेऊ, असा निरोप त्यांनी दिला. 

पुणे ः हमाल मापाडी प्रश्नांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी खरंच मनाचा मोठेपणा दाखविला आणि तीन मंत्री घेऊन ते भेटायला आले. त्यामुळे समाधान वाटले, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी गुरुवारी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. पहिल्यांदाच इतकी संवेदनशीलता कोणीतरी दाखविली आहे, असेही त्यांनी सांगितले. 

तोलाईची जुनी पद्धत योग्य, पण काही बदल होणार, अहवालावर लगेच अंमलबजावणी

Image may contain: 3 people, people sitting, table and indoor, text that says "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी"

मार्केटयार्डात निर्सग सभागृहामध्ये सुमारे दीड तास झालेल्या या बैठकीत पवार यांनी सर्व मुद्दे बारकाईने ऐकूण घेतले. त्यात योग्यवेळी त्यांनी अधिकारी, मंत्री यांनाही खुलासे करण्यास सांगितले. निर्णय घेण्यात अडचणी काय आहेत, याचीही विचारणा केली. तसेच तत्काळ निर्णय घेण्याच्याही सूचना दिल्या. मंत्र्यांबरोबर तिन्ही खात्यांचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही या बैठकीस काही वेळ उपस्थिती लावली. 

Image may contain: 1 person, outdoor
बैठकीनंतर बोलताना, डॉ. आढाव यांनी हमाल- मापाडींच्या प्रश्नांबाबत पहिल्यांदाच कोणी तरी इतकी संवेदनशीलता दाखविली आहे. माझ्या वयाचा विचार करून पवार तीन मंत्री घेऊन भेटायला आले, यातून त्यांच्या मनाचा मोठेपणा दिसला, असेही डॉ. आढाव यांनी सांगितले. वळसे पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानुसार राज्यात एक महिन्यात हमाल मापाडी मंडळ स्थापन झाले तर अधिकाऱयांची एकाधिकारशाही संपेल आणि कष्टकऱयांच्याबाबत नव्या पर्वाला सुरवात होईल, अशी आशाही डॉ. आढाव यांनी व्यक्त केली. 

तरुणांनो, 'या' १० क्षेत्रांत लाॅकडाऊनमध्येही मिळतेय नोकरीची संधी!​

Edited by : Sharayu Kakade


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: social worker baba adhav statement about ncp leader sharad pawar