पंतप्रधानांचा ताफा अडविण्याचा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाई स्थानबद्ध

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

पुणे : केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना अद्यापही प्रवेश न मिळाल्याचा जाब विचारण्यासाठी शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा अडविण्याचे पत्र देणाऱ्या तृप्ती देसाई यांना पहाटे 4 वाजता पोलिसांनी स्थानबद्ध केले. त्यानंतर 5.45 वाजता त्यांना सहकारनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही शबरीमला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश देण्यात आलेला नाही. दुसरीकडे महिलांवरील अन्याय, अत्याचार वाढत आहेत. "मीटू" चळवळ जोर धरत आहे. असे असूनही पंतप्रधान मोदी या संवेदनशील विषयावर काहीच बोलत नाहीत. त्याबद्दल त्यांना जाब विचारण्यासाठी आणि त्यांचा ताफा अडविण्यासाठी देसाई आज शिर्डी येथे जाणार होत्या. त्याबाबतचे पत्र त्यांनी नगरच्या पोलिस अधिक्षकांना दिले होते. 

या पार्श्वभूमीवर सहकारनगर पोलिसांनी पहाटे 4 वाजताच देसाई शिर्डीला निघालेल्या असतानाच त्यांना स्थानबद्ध केले. त्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन 5.45 वाजता सहकारनगर पोलिस ठाण्यात आणले. देसाई म्हणाल्या, "सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला केरळमधील भाजप हरताळ फासत आहे. महिलांना अद्याप मंदिर प्रवेश नाही. त्याविरुद्ध आवाज उठविणाऱ्या महिला, पत्रकारांना धमक्या येत आहेत. याचाच जाब मोदींना विचारण्यासाठी आम्ही जाणार होतो. त्यापूर्वीच मला पोलिसांनी ताब्यात घेतले."

Web Title: Social worker Trupti Desai detained by Pune Police