उंड्रीत गांडूळखत प्रकल्प उभारण्याची सोसायट्यांना सक्ती

समीर तांबोळी
शनिवार, 5 मे 2018

उंड्री - ओला कचरा सोसायटीतच जिरवा, त्यासाठी गांडूळ्खत प्रकल्प राबवा, ओला व सुका कचरा वेगळा करा. तरच कचरा उचलला जाईल अशी तंबी महापालिकेने उंड्रीतील सोसायट्यांना दिली आहे. उंड्रीत महापालिकेच्या कचरा व्यवस्थापन विभागाने सोसायट्यांचा कचरा उचलण्यास आज स्प्ष्ट नकार दिल्यामुळे उंड्रीकरांच्या अडचनीत भर पडली आहे. त्यामुळे या कचर्‍याचे करायचे काय? हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

उंड्री गाव सहा महिन्यापुर्वी महापालिकेत समाविष्ट झाले असून सोसायट्यांचा कचरा उचलण्यासाठी महापालिकेच्या गाड्या येतात. यापुर्वी ओला सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती नव्हती. दोन्ही प्रकारचा कचरा उचलला जात होता. परंतु, आता कचरा घेण्यास नकार देण्यात आला आहे.  प्रत्येक सोसाय़ट्यांमध्ये वर्मीकल्ट्यर प्लँट (गांडूळ खत प्रकल्प) उभारण्याची सक्ती केली जात आहे. लहान सोसायट्यामध्ये प्रकल्प उभारण्यास जागा उपलब्ध नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. तर मोठ्या सोसायट्यांनी या साठी किमान तीन महिन्याची मुदत द्या अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

याबाबत उंड्री कचरा व्यवस्थापन कर्मचारी चव्हाण म्हणाले, सहा महिन्यापासून नागरिकांना ओला व सुका कचरा वेगळा करण्यास सांगितला जात आहे. परंतू नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. 

महापालिकेचा निर्णय अन्यायकारक आहे, गांडूळखत प्रकल्प उभारण्यास किमान तीन महिन्याचा कालावधी द्यावा. कचरा विभागाकडे ओला सुका कचरा गोळा करण्यास स्वतंत्र व्यवस्था, वाहने नाहीत. त्याची व्यवस्था प्रथम करावी.
डॉ.आश्विन खिलारे 

मी आमच्या सोसायटींच्या नागरिकांना(ईरा सोसाय़टी) ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यास प्रव्रूत्त केले. ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी दोन वेगवेगळ्या कुंड्या घेण्यास सांगितले. आपण महापालिकेच्या नियमांचे पालन केले पाहिजे.
अतीष परदेशी

पीएअमआरडीएने बांधकामाना परवानगी दिल्या कशा?
नवीन बांधकामाना परवानगी देण्याचे काम पुर्वी प्राधिकरणाकडे(पीएम आरडीए) होते. यावेळी गांडूळखत प्रकल्प उभारला गेला की नाही हे न पहाता परवानग्या दिल्या कश्या? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

Web Title: society forced the to set up vermicomposting