सोसायटीच्या नकाशात फेरफार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

येरवडा - कळस येथील स. नं.१२४ सोसायटीच्या नकाशा (ले-आउट) मध्ये एका बांधकाम व्यावसायिकाने चक्क फेरफार केले आहे. व्यावसायिकाने महापालिकेच्या आरक्षित जागेऐवजी संबंधित मिळकतीच्या मोकळ्या जागेत ट्रान्सफॉर्मर व कचरा पेटी बसविली आहे. एवढेच नसून महापालिकेच्या बांधकाम विभागाने बांधकाम व्यावसायिकाला आर्थिक फायदा मिळवून देण्याकरिता टीडीआर देण्याचा प्रयत्न चालू असल्याचा धोकादायक प्रकार समोर आला आहे. 

कळस येथील एका सोसायटीच्या नकाशामध्ये महापालिकेच्या आरक्षित जागेत ट्रान्सफॉर्मर व कचरा पेटी दर्शविण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात संबंधित मिळकतीच्या ओपन स्पेसच्या जागेत ट्रान्सफॉर्मर व कचरा पेटी बसविण्यात आले आहे. याची माहिती असूनदेखील महापालिकेच्या  बांधकाम विभाग व टीडीआर विभागाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. एवढेच नव्हे, तर अधिकारी  संबंधित बांधकाम व्यावसायिक व आर्किटेक्‍चरला आर्थिक फायदा मिळून देण्याकरिता टीडीआर देण्यास प्रयत्नशील आहेत.

येथील एका सदनिकाधारकाने अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांच्याकडे तक्रार केल्यावर दक्षता विभागाने अहवाल दिला. या अहवालात ट्रान्सफॉर्मर व कचरा पेटी हे ॲमेनिटीच्या जागेत नसून ओपन स्पेसच्या जागेत असल्याचे मान्य केले, तर ट्रान्सफॉर्मर व कचरा पेटी ओपन स्पेसच्या जागेत कायद्याप्रमाणे व नियमानुसार बसू शकत नाही, असे बांधकाम विभागाने संबंधित बांधकाम व्यावसायिकाला कळविले आहे. मात्र टीडीआर व बांधकाम विभाग या दोन्ही विभागांत आपआपसात वाद असल्यामुळे प्रकरण जैसे थे आहे. 

ले-आउट रिवाइज्ड होत नाही, तोपर्यंत संबंधित बांधकाम व्यावसायिकाला कोणत्याही प्रकारचा (टप्पा १ किंवा टप्पा २) टीडीआर देऊ नये.
 - शशिकांत साटोटे, रहिवासी

कळस येथील स. नं.१२४ सोसायटीच्या नकाशा (ले-आउट) संदर्भात तक्रारदारांची मागणी असल्यास ले-आउट रिवाइज्ड करता येऊ शकतो.
 - विलास फड , कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग

Web Title: society map changes building TDR