सोफासेटचे दुकान आगीमध्ये खाक (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 डिसेंबर 2018

पुणे - सोफासेटच्या दुकानाला आग लागण्याची घटना गुरुवारी (ता. २०) पहाटे चार वाजता भवानी  पेठेमध्ये घडली. या आगीमध्ये सोफासेटच्या दुकानासह एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. याबरोबरच दुकानासमोर उभ्या केलेल्या अन्य ४ दुचाकी, शेजारील दुकाने व समोरील दोन घरांनाही आगीची झळ बसली.

संबंधित दुकानातून पहाटे चार वाजता अचानक आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यानुसार रहिवाशांनी अग्निशामक दलाला खबर दिली. त्यानंतर अग्निशामक दलाचा एक बंब, पाण्याचा टॅंकर व पाच जवान दाखल झाले. आठ मिनिटांमध्ये आग आटोक्‍यात आणली. 

या आगीमध्ये दुकानांमधील ३ ते ४ सोफासेट, समोर उभी असणारी दुचाकी पूर्णपणे जळाली. याबरोबरच दुकानासमोरील ४ दुचाकींनाही झळ पोचली. दरम्यान, आग मोठी असल्याने त्याची झळ शेजारील, कपडे शिलाईचे दुकान व समोरील घरांनाही बसली. आगीचे कारण समजू शकले नाही.

पहाटे घराच्या खिडकीतून मोठा प्रकाश दिसला. दुकानाला मोठी आग लागल्याचे दिसले. अग्निशामक दलाला खबर दिली. तत्पूर्वी दुकान पूर्णपणे जळाले होते.
- संजय लोकरे, प्रत्यक्षदर्शी.

Web Title: Sofaset SHop Fire Loss

टॅग्स