वाहन परवान्याची 'सॉफ्ट कॉपी' देखील आता ग्राह्य

मिलिंद संगई
मंगळवार, 21 ऑगस्ट 2018

बारामती - या पुढील काळात तुमच्या जवळ वाहन चालविण्याचा परवाना प्रत्यक्षपणे नसला आणि मोबाईलमधील डिजी लॉकरमध्ये जतन केलेला परवाना असला तरी तो ग्राह्य धरला जाणार आहे. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी नुकतेच एक परिपत्रक काढून ही बाब स्पष्ट केली आहे. गडबडीत तुम्ही वाहन चालक अनुज्ञप्ती वाहन नोंदणी प्रमाणपत्र घरी विसरला असाल आणि तुमच्या डिजी लॉकर या अँपमध्ये जर हे जतन करुन ठेवलेले असेल तर ही डिजीटल स्वरुपातील कागदपत्रेही ग्राह्य धरण्याच्या सूचना पोलिस व परिहवन अधिका-यांना करण्यात आल्या आहेत. 

पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षक स्तरावर बैठक घेऊन डिजी लॉकर बाबत सविस्तर माहिती खात्याअंतर्गत अधिकारी व कर्मचा-यांना देण्याचेही शेखर चन्ने यांनी सुचविले आहे. अनेकदा वाहनचालक गडबडीत वाहन चालविण्याचा परवाना तसेच वाहन नोंदणी प्रमाणपत्रे विसरुन जातात, अचानक प्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा वाहतूक पोलिसांकडून त्याची मागणी झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होत होती. मात्र केंद्र शासनानेच डिजी लॉकरमध्ये जर कागदपत्रे जतन करुन ठेवलेली असतील तर ती ग्राह्य धरण्यास मान्यता दिली होती. त्याची अंमलबजावणी आता महाराष्ट्रातही केली जाणार आहे. 

वाहन चालविण्याचा परवाना किंवा वाहन नोंदणी डिजिटल स्वरुपात दाखविण्यात आल्यास पुन्हा पुस्तकी स्वरुपात या कागदपत्रांची मागणी करु नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.एखाद्या प्रकरणात वाहन परवाना किंवा वाहन नोंदणी प्रमाणपत्र जप्त करायचे असेल तर अंमलबजावणी पथकाने त्याची नोंद ई चलान माध्यमातून वाहन सारथी प्रणालीत घ्यावी व अशा प्रकरणात पुस्तकी स्वरुपातील कागदपत्रे जप्त करण्याची आवश्यकता नसल्याचेही सूचित करण्यात आले आहे. 

वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार
अनेकदा वाहन चालविण्याचा परवाना व वाहन नोंदणी प्रमाणपत्र असूनही केवळ प्रत्यक्ष सादर न करता आल्याने होणा-या दंडात्मक कारवाईपासून या निर्णयामुळे वाहनचालकांची मुक्तता होणार आहे. या निर्णयाचे सर्वत्रच स्वागत करण्यात येत आहे. 

Web Title: The 'soft copy' of the vehicle license is also valid