#DrugTrafficking : पुणेकर तरूणाईचा झालाय 'उडता पंजाब'

DrugTrafficking
DrugTrafficking

पुणे : शहरातील महाविद्यालयीन व नोकरदार तरुण अमली पदार्थ तस्करांचे "सॉफ्ट टार्गेट' ठरत आहेत. पुणे पोलिसांनी 10 महिन्यांत पावणेदोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून त्यामध्ये 62 जणांना अटक केली आहे. विशेषतः गांजा, ब्राऊन शुगर, हेरॉइन, कोकेन, मेफेड्रोनपासून एलएसडी स्टॅपसारख्या अमली पदार्थांच्या विळख्यात शहरातील तरुणाई अडकल्याचे दिसत आहे. 

तस्करांकडून "पुणे टार्गेट' का? 
शहरामध्ये मोठ्या संख्येने शिक्षण, नोकरी, उद्योग-व्यवसायांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून तरुण मोठ्या संख्येने येतात. त्यांना अमली पदार्थांच्या जाळ्यात ओढून व्यसन लावण्याचे काम काही जणांकडून केले जाते. कोंढवा, कोरेगाव पार्क, लष्कर, औंध, बाणेर परिसरातून महाविद्यालयीन तरुणांचा शोध घेऊन त्यांना अमली पदार्थांची विक्री केली जाते. याबरोबरच पार्ट्यांमध्येही अमली पदार्थ पोचविण्याचे काम केले जाते. 

नायजेरियन नागरिकांचा सहभाग 
वेगवेगळ्या कारणांनिमित्त शहरामध्ये वास्तव्य करून ठराविक नायजेरियन व्यक्ती अमली पदार्थ विक्रीत सहभागी होत आहेत. ही गोष्ट पोलिस व सीमाशुल्क विभागाच्या कारवाईमध्ये अटक केलेल्या आरोपींवरून स्पष्ट झाले आहे. एमडी, एलएसडी स्टॅम्प, कोकेन हे मुंबईमार्गे पुण्यात पोचत असून त्यामध्ये नायजेरियन नागरिकांचा सहभाग आहे. अफू, चरस, गांजा उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थानमधून येतो; तर एमडी, कोकेन हे मुंबईमार्गे पुण्यात पोचते. 

या अमली पदार्थांची होते विक्री 
पुणे पोलिसांचे अमली पदार्थविरोधी पथक व सीमाशुल्क विभागाकडून अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाते. त्यामध्ये गांजा मिक्‍स तरंग गोळ्या, कोकेन, बाऊन शुगर/हेरॉइन, अफू, चरस, मेफेड्रोन/एमडी/च्यावमॅव, मेफेड्रोन यांसारखे अंमली पदार्थ आढळले आहेत. त्यामध्ये एस्कटसी गोळ्या, एलएसडी स्टॅम्प यांसारखे वेगळे प्रकारही शहरात येत आहेत. सीमाशुल्क विभागाच्या सहआयुक्त वैशाली पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाने मागील काही दिवसांत केलेल्या कारवाईत कोकेन, मेफेड्रॉन, एलएसडी स्टॅम्प अशी 28 लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. त्यामध्ये महागडा "एलएसडी स्टॅम्प'चा समावेश आहे. 

पोलिसांकडून अमली पदार्थविरोधी कारवाई केली जाते. केवळ कारवाईपुरतेच मर्यादित न राहता महाविद्यालयीन व नोकरदार तरुणांमध्ये अमली पदार्थांबाबत जनजागृतीवर भर दिला जातो. तसेच, विविध ठिकाणी कार्यशाळा, कार्यक्रम घेतले जात आहेत. 
- अशोक मोराळे,  अपर पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा. 

अटक केलेले आरोपी - 62 
गांजा विक्रीत सर्वाधिक अटक - 53 
11 महिन्यांतील अमली पदार्थ प्रकरणे - 51 

जप्त केलेले अंमली पदार्थ किंमत प्रकरणे 
कोकेन - एक किलो 255 ग्रॅम एक कोटी 40 लाख 62 हजार 600 4 
गांजा/तरंग गोळ्या - 102 किलो 535 ग्रॅम एक लाख 96 हजार 350 43 
ब्राऊन शुगर/हेरॉइन - 101 ग्रॅम पाच लाख 7 हजार 350 01 
मेफेड्रोन/च्यावम्याव/एमडी - 55 ग्रॅम दोन लाख 53 हजार 03 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com