पुण्यात अनोखा प्रयोग; शौचालय उजळणार सोलर पॅनेलने

Solar Panel to be used in public toilets from Balewadi
Solar Panel to be used in public toilets from Balewadi

बालेवाडी : औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत बोपोडी गाव येथील विठ्ठल मंदिरा जवळील सार्वजनिक शौचालयाचे नूतनीकरण व सोलर पॅनल चा उद्घाटन सोहळा तारीख १४ नोव्हेंबर २०१९ रोजी बोपोडी येथे पार पडला.

स्वच्छ सर्वेक्षण मधील बेस्ट टॉयलेट च्या बाबींची पूर्तता करणारे हे पुणे महानगर पालिकेचे सोलरचे पहिले शौचालय असून, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप कदम यांच्या संकल्पनेतून ही अनोखी योजना साकारली आहे.

बोपोडी गाव येथे विठ्ठल मंदिराजवळ एक सार्वजनिक शौचालय असून याठिकाणी फक्त रात्रीच्या वेळी वीज पुरवठा केला जात होता. यामुळे पाणी टंचाई व स्वच्छतेवर मर्यादा येत असल्याने या ठिकाणी या शौचालयाचे नूतनीकरण करून कायमचा वीज पुरवठा होण्यासाठी येथे सोलर पॅनल लावण्यात आले आहेत. स्वच्छ सर्वेक्षण मधील बेस्ट टॉयलेटच्या सर्व बाबींची सोय व पूर्तता येथे करण्यात आली आहे. यामध्ये महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन, वेल्डिंग मशिन बरोबरच इन्सिनेटर मशिनसुध्दा बसविलेली आहे.

प्रत्येक सीटमध्ये लाईटची सोय, स्वंतत्र बकेट, हॅन्डवॉश, आरसा व ड्रायर बसविण्यात आले आहेत. नवीन कलर कोड प्रमाणे रंगविलेले आहे. याचप्रमाणे क्षेत्रिय कार्यालयातील इतर शौचालयांची रंगरंगोटी केली आहे. या ठिकाणी देखरेखीसाठी एक व्यक्ती ही नेमण्यात आली आहे. पुणे शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2020 दृष्टीपथात ठेवत हे काम सहआयुक्त मोळक यांच्या मार्गदर्शननाखाली व नेतृत्वाखाली पूर्ण करण्यात आले आहे.

मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये जरी पुण्याला 37वा नंबर मिळाला असला तरी या वर्षी या संदर्भात ज्या पद्धतीने काम सुरू आहे त्या बद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. या अनोख्या शौचालयाचे नूतनीकरण व सोलर पॅनलच्या उद्घाटन विजय शेवाळे, नगरसेवक क्रीडा समिती अध्यक्ष  यांचे हस्ते व सुनिता वाडेकर नगरसेविका अन्   ज्ञानेश्वर मोळक सह आयुक्त, प्रकाश ढोरे स्थायी समिती सदस्य  यांचे उपस्थित करण्यात आले. यावेळी सहा आयुक्त संदिप कदम, उपअभियंता श्री अदिवंत व औंध क्षे.का. सर्व कर्मचारी,अभियंते व बोपोडी येथील नागरिक ,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. ज्ञानेश्वर मोळक यांनी श्री कदम व सर्व टीमचे अभिनंदन केले. इतर क्षेत्रिय कार्यालयांनी असेच करण्याची अपेक्षा व्यक्त केली,तसेच मनपा कडुन हे अत्याधुनिक असे सौचालय केवळ नागरिकांच्या सोई साठीच बनवण्यात आले असुन नागरिकांनी ही ते योग्य पद्धतीने वापरून सहकार्य करणे गरजेचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com