अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा प्रयोग, सौर ऊर्जेवरील मोटार विकसित

talegaon
talegaon

तळेगाव स्टेशन - मावळ तालुक्यातील आंबी येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यांतर्गत सौरऊर्जेवर चालणारी इलेक्ट्रीक कार विकसित केली आहे. तीन तास चार्जिंग केल्यानंतर ही कार साधारणतः ताशी चाळीस किमीच्या वेगाने ऐंशी किलोमीटर धाऊ शकत असल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे झालेली जागतिक तापमानवाढ आणि इंधनाच्या वाढत्या दरांमुळे पारंपारिक इंधनावरील कार वापरण्यावर मर्यादा येऊ लागल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर अगदी मोफत, सर्वत्र आणि मुबलक उपलब्ध असणाऱ्या सौर ऊर्जेवर चालणारी कार विकसित करण्यात आंबी येथील डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनीरिंग अकॅडेमिच्या यंत्र अभियांत्रिकी अंतिम वर्ष शाखेच्या विद्यार्थ्यांना यश आले आहे. 

दोन व्यक्ती सहज बसतील, अशी रचना असणारी ही कार सोलर पॅनल, बॅटरी आणि इलेक्ट्रीक सर्वो मोटर वापरुन गेल्या वर्षभराच्या परिश्रमानंतर यशस्वी होऊन प्रदर्शनासाठी सज्ज झाली आहे. साधारणतः दिडशे किलो वजन क्षमता असलेल्या या कारचा निर्मात्यांचा दावा आहे. इंजिन कारला उत्तम पर्याय म्हणून या वाहनाकडे पाहिले जात आहे. सध्या हे वाहन सौर आणि विद्युत ऊर्जा अशा दोन्ही पद्धतीने स्वयंचलित करता येते. विशेष म्हणजे या कारमध्ये कोणतेही इंजिन बसविलेले नाही. प्राथमिक चाचणीनंतर आता लवकरात लवकर बॅटरी चार्जिंग आणि जास्त काळासाठी विद्युत पुरवठा कसा करता येऊ शकेल याबाबत शंशोधन सुरु आहे. 

अपारंपारीक ऊर्जा वापरास चालना देणारी ही सोलर कार शेती, मोठे गृहप्रकल्प, प्रदर्शन आणि शहरांतर्गत मर्यादीत पल्ल्याच्या प्रवासासाठी सोईस्कर ठरू शकते. १० विद्यार्थ्यांच्या जिद्दीला कॅम्पस डायरेक्टर रमेश वसप्पानवर, प्राचार्य डॉ. विलास नितनवरे, अध्यापक सागर पाटील आणि सागर शिंदे यांच्या बहुमोल मार्गदर्शनाची जोड मिळाल्यामुळे ही विशेष कार निर्मिती होणे शक्य झाले.

"वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरांसोबतच उत्सर्जित  वायूमुळे होणारे वायु आणि ध्वनी प्रदूषण टाळणे  सोलर मोटारीमुळे येत्या काळात शक्य होणार आहे." - डॉ. विलास नितनवरे (प्राचार्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनीरिंग अकॅडेमी-आंबी,मावळ,पुणे)

■सोलर कारची वैशिष्ट्ये■
●पुर्णतः प्रदूषणमुक्त आणि इंजिनविरहीत
●दोन व्यक्तींची आसन क्षमता.
● सर्वसाधारण रस्त्यांवर चालण्यास सक्षम. 
●८० किमी अंतर धावण्याची क्षमता. 
●छतावरील सोलर पॅनेलमधून मोफत उर्जानिर्मिती.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com