प्राधिकरण उभारणार सौरऊर्जा प्रकल्प

Solar-Power-Project
Solar-Power-Project

पिंपरी - मोशी येथील पेठ क्रमांक ५ व ८ येथील पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रामध्ये पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे सौरऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून अडीच ते तीन मेगावॉट विजेची निर्मिती होऊ शकणार आहे. 

प्रदर्शन केंद्राच्या छतावर सौर पॅनेल बसविण्याचे नियोजन होते. मात्र, प्रदर्शन केंद्राचे काम पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. ही बाब लक्षात घेता प्राधिकरणाने सद्य:स्थितीत केंद्रासाठी प्रस्तावित असलेल्या जागेतून जाणाऱ्या एचपीसीएल पाइपलाइनच्या दोन्ही बाजूला सौरऊर्जा पॅनेल बसविण्याचे नियोजन केले आहे. संबंधित पॅनेल हे सुमारे दोन किलोमीटर लांबी आणि १८ मीटर रुंदीच्या पट्ट्यामध्ये बसविण्यात येतील. त्यासाठी प्राधिकरणाच्या अर्थसंकल्पात एक कोटी रुपयांची तरतूद केली आहे.  

एचपीसीएल पाइपलाइनशेजारील जागेत (मार्गदर्शक तत्त्वानुसार) अन्य विकासावर बंधने येतात. त्यामुळे पाइपलाइनची जागा संपल्यानंतर मोकळ्या राहणाऱ्या जागेत सौरऊर्जा पॅनेल बसविण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी एचपीसीएलची परवानगी घ्यावी लागणार आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर आवश्‍यक धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. 

सौरऊर्जा प्रकल्पामुळे फायदे 
 सुमारे अडीच ते तीन मेगावॉट विजेची निर्मिती होणार
 निर्माण होणारी वीज प्राधिकरण महावितरणला विकू शकणार
  खासगी कंपन्या, व्यापारी संस्था यांनाही वीज विकणे शक्‍य

मोशी येथे साकारणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी सर्व आवश्‍यक परवानग्या घेण्यात येतील. पुढील दोन वर्षांत हा प्रकल्प मार्गी लावण्याचे नियोजन आहे. 
- सदाशिव खाडे, अध्यक्ष, प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com