सौरऊर्जेने उजळले विद्यापीठ

Solar-Power
Solar-Power

पुणे - सौरऊर्जेचा वापर करण्यासाठी ग्रीन एनर्जी मिशनद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. विद्यापीठातील एकूण चौदा इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात सहा इमारतींसाठी सुरू केला आहे. या प्रकल्पामुळे ३५ लाख ५० हजार रुपयांच्या विजेची दरवर्षी बचत होणार आहे. 

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते प्रकल्पाचे उद्‌घाटन झाले. या वेळी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम उपस्थित होते. विद्यापीठातील आंतरशाखीय ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागांतर्गत ६०२ किलोवॉट पीट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे कामकाज होत आहे. या प्रकल्पासाठी विद्यापीठ आवारातील सर्व इमारतींचे निरीक्षण करण्यात आले. त्यामधील १४ इमारतींवर हा प्रकल्प सुरू करणार आहे. हा प्रकल्प २० सप्टेंबरपर्यंत कार्यान्वित केला जाईल, असे आंतरशाखीय ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागाचे संचालक डॉ. संदेश जाडकर यांनी सांगितले.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
 आंतरशाखीय ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागांतर्गत एकूण ६०२ किलोवॉट पीट क्षमतेचा प्रकल्प
 केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर प्रकल्पाचे काम ‘क्‍लीनमॅक्‍स’ कंपनीला देणार 
 पहिल्या टप्प्यात विधी विभाग, सेंटर फॉर मॉडेलिंग अँड सिम्युलेशन, आंबेडकर भवन, जयकर ग्रंथालय, कॅप भवन, डिपार्टमेंट ऑफ टेक्‍नॉलॉजी इमारतींवर प्रकल्प कार्यान्वित
 विद्यापीठ आवारातील ऊर्जेच्या गरजेतील ३५.५० लाख रुपयांच्या विजेची दरवर्षी होणार बचत
 आठ लाख ७२ हजार ९०० किलोवॉट इतकी ऊर्जा वाचेल
 पुढील २५ वर्षांसाठी प्रतिवर्ष ७१६ टन कार्बन उत्सर्जन कमी करण्यास होणार मदत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com