फौजीच्या मदतीला सरसावले हात

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 मे 2018

पुणे - गुलमर्गच्या बर्फाच्छादित प्रदेशात पाय रोवून देशाची सीमा अभेद्य ठेवणाऱ्या फौजीच्या मुलाच्या शस्त्रक्रियेला मदत करण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले. सीमेवर गस्त घालणारा हा जवान आपल्याच घरातील आहे, या भावनेने प्रत्येक संवेदनशील नागरिकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे केला आहे.

‘मुलासाठी फौजी लढतोय अन्‌ रडतोयही !’ या शीर्षकाखाली नुकतीच ‘सकाळ’मध्ये बातमी प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर ‘सकाळ’ कार्यालयात फौजीला आर्थिक मदत देण्याची विचारणा करण्यासाठी दिवसभर दूरध्वनी खणखणत होता. या शस्त्रक्रियेसाठी एक लाख रुपयांचा खर्च झाला असून, पुढे अजून एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यानंतर औषधोपचार करण्यासाठी एक लाख रुपयांहून खर्च अपेक्षित आहे. त्यासाठी फौजीच्या पत्नी रेखा कांबळे यांनी आर्थिक मदतीचे आवाहन केले आहे. 

आपली आर्थिक मदत बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या आजरा शाखेतील खात्यात जमा करावी. कांबळे यांचा बचत खाते क्रमांक ६०१५८७५३९६७ असून, त्यांचा ‘एमआयआरसी कोड’ ४१६०१४०१६ आणि ‘आयएफएससी कोड’ एमएएचबी ००००१५० हा आहे.

Web Title: soldier help