जवानांना समाजाकडून सन्मानाची अपेक्षा 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

पुणे - ""युद्धकाळात किंवा जवान शहीद झाल्यानंतरच त्यांच्या कुटुंबीयांची आठवण होते. सीमेवर लढणाऱ्या जवानांना समाजाकडून धन नव्हे, तर सन्मानाची वागणूक अपेक्षित आहे. त्यांच्या सन्मानासाठी समाजाने मोठे मन करण्याची गरज आहे,'' अशी भावना कर्नल सदानंद साळुंके (निवृत्त) यांनी शुक्रवारी व्यक्त केली. 

दिवा प्रतिष्ठान आणि वीर हनुमान मित्रमंडळातर्फे मालतीताई मानकर स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा "यशोदा पुरस्कार' शहीद लान्सनायक पांडुरंग गावडे यांच्या 

आई महालक्ष्मी गावडे यांना साळुंके यांच्या हस्ते देण्यात आला. या वेळी माजी आमदार उल्हास पवार, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रवचनकार मंगला कांबळे, गावडे यांचे बंधू हवालदार अशोक गावडे, माधवराव मानकर, सैनिक मित्र परिवाराचे अध्यक्ष अशोक मेहेंदळे, आनंद सराफ, माजी उपमहापौर दीपक मानकर, करण मानकर उपस्थित होते. 

साळुंके म्हणाले, ""जवानांमुळेच आपण इथे सुरक्षित जीवन जगत आहोत. जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांना कायम आदराची वागणूक मिळाली पाहिजे.'' साळुंके यांना देण्यात आलेला 70 हजार रुपयांचा धनादेश त्यांनी सामाजिक कार्यासाठी मानकर यांच्याकडे पुन्हा सुपूर्द केला. 

पवार म्हणाले, ""शांततेच्या काळात समाजाला जवानांच्या कार्याचा विसर पडतो. परंतु जवान व त्यांच्या कुटुंबीयांना सन्मानाची वागणूक दिल्यास त्यांना आणखी बळ मिळेल.'' 

मानकर म्हणाले, ""जवान व त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याची सामाजिक जबाबदारी आम्ही पार पाडत आहोत.'' प्रास्ताविक हर्षवर्धन मानकर यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले. 

घरासाठी पंचवीस हजारांची मदत 
सीमेवर देशासाठी लढणाऱ्या बाळू चौगुले या जवानाचे शिरूर तालुक्‍यातील मांडवगण फराटा येथील घर समाजकंटकांनी पाडले. त्या घटनेचा निषेध करत घर बांधण्यासाठी चौगुले यांच्या कुटुंबीयांना या कार्यक्रमात 25 हजार रुपयांची मदत देण्यात आली, तसेच शहीद लेफ्टनंट कर्नल मनीष यादव यांचे वडील शशिकांत कदम यांचाही सन्मान करण्यात आला. 

Web Title: The soldiers expect respect from society