'ट्रॅफिक जॅम' संपवायला हे कराच..! 

राहुल बडवाईक 
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

'पुण्यातील वाहतुकीची समस्या' या विषयावर इतर सर्वजण काही ना काही उपाय सुचवत असतातच. थेट सर्वसामान्य वाहनचालकांकडूनच आलेल्या या सूचनांचा वापर प्रशासन किती करतं, हा वादाचा विषय असला तरीही ही समस्या सोडविण्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे, हेही खरंच! राहुल बडवाईक या पुणेकराने काही सूचना मांडल्या आहेत. वाचा, विचार करा आणि तुम्हीही सहभागी व्हा..! पाठवा तुमच्या सूचना, मते आम्हाला webeditor@esakal.com या ई-मेल आयडीवर आणि 'सब्जेक्‍ट'मध्ये लिहा Pune Traffic 

1. 'स्पीड ब्रेकर'च्या ऐवजी 'स्पीड लिमिट'चे पालन सक्तीचे करा. 

2. सिग्नल पार केल्यानंतर लगेचच 'स्पीड ब्रेकर' असेल, तर गाड्यांचा वेग कमी होतो आणि मग चौकातच वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सिग्नलनंतर असलेले 'स्पीड ब्रेकर' काढून टाका. 

3. काही रस्त्यांवर ठराविक कालावधीसाठी 'नो ओव्हरटेक'चा नियम लागू करून बघा. 

4. दुकानांमध्ये गोडाऊनमधून माल ने-आण करण्यासाठी एक वेळ ठरवून द्या. 

5. फूटपाथ नीट करून पादचाऱ्यांना त्यावरूनच चालणे सक्तीचे करा. 

6. रस्त्यावर कार पार्किंग करताना उभी किंवा आडवी करण्यापेक्षा तिरकी लावण्याची सवय लावा. 

7. बीआरटी नसलेल्या रस्त्यांवरही 'पीएमपीएमएल'च्या बससाठी एक लेन राखीव ठेवावी. 

8. बसस्टॉप किंवा रिक्षा स्टॅंड हे अगदीच चौकात नको. चौकापासून या दोन गोष्टी किमान 60 ते 70 मीटर दूर हवे. काही बसस्टॉप असे आहेत की चौक पार केला, की लगेचच चिकटून बस उभ्या राहतात. तिथे बस किंवा रिक्षा उभी राहिली, की त्याच्या मागे इतर गाड्या अडकतात आणि वाहतूक कोंडी होते. 

9. काही खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये कामाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 4 अशी करा. अर्थात, याची सक्ती करता येणार नाही. पण वाहतूक सुरळीत करण्याच्या मोहिमेमध्ये यांचाही सहभाग असेल, तर सर्वांनाच सोयीचे होईल. हे पटवून सांगता आले, तर किमान काही कार्यालयांच्या वेळांमध्ये तरी बदल होईल. 

10. सर्वच प्रकारच्या वाहनांनी वळायच्या किमान 100 मीटर आधी 'इंडिकेटर' द्यायला हवा, याची सवय लावायला हवी. 

11. रस्त्यावरचं पार्किंग कमी करण्यासाठी प्रत्येक भागात मोठ्या पार्किंगची व्यवस्था हवी. 

12. शहरात नव्याने होणाऱ्या प्रत्येक निवासी किंवा व्यावसायिक प्रकल्पामध्ये स्वत:ची पार्किगची व्यवस्था असलीच पाहिजे. 

13. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, वाहतुकीचे नियम सक्तीने पाळायला लावा. मग वाहनचालक एखादी सामान्य व्यक्ती असेल किंवा कुण्या बड्या असामीच्या ओळखीची..! इतर गोष्टींमध्ये समजू शकतो; पण वाहतूक सुरळीत करण्यात कुठलं आलं राजकारण? सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना विश्‍वासात घ्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना समजावून सांगा, की वाहतुकीचे नियम पाळल्यास तुझी प्रतिमा बिघडणार नाही.. 

अशा काही उपायांमुळे पुण्यातील वाहतुकीची 60 ते 70 टक्के समस्या संपू शकेल, असे मला वाटते. 

Web Title: Solutions for Traffic Jam in Pune, by Rahul Badwaik