सोमय्या कोल्हापुरातील आणखी दोन घोटाळे काढणार बाहेर - चंद्रकांत पाटील

किरीट सोमय्यांच्या मुंबईतील घराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा
Chandrakant Patil
Chandrakant Patilesakal

पुणे : हसन मुश्रीफांसंदर्भातील आणखी दोन प्रकरणं किरीट सोमय्या बाहेर काढणार आहेत, याची कुणकुण लागल्यानेच त्यांना कोल्हापूरात जाण्यापासून पोलिसांनी रोखलं आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केला आहे. सोमय्यांच्या घराबाहेर पोलिसांनी वेढा द्यायला ते काय दहशतवादी आहेत का? असा सवालही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केला.

Chandrakant Patil
मुश्रीफांचा घोटाळा बाहेर काढला म्हणून माझ्या अटकेचे आदेश: किरीट सोमय्या

पाटील म्हणाले, माजी खासदार किरीट सोमय्यांच्या मुंबईच्या घराबाहेर शंभर पोलिसांनी वेढा घातला. कशासाठी? काय किरीट सोमय्या दहशतवादी आहेत? राज्यात दहशतवादी उजळ माथ्यानं फिरतायत. मुंबईमध्ये घातपात करण्यासाठी, स्फोट घडवण्याच्या प्रयत्नात असलेले लोक पकडले जात आहेत. अजूनही काही पकडायचे आहेत. बलात्कारी लोक मोकाट फिरत आहेत. पण इकडे सोमय्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची प्रकरणं बाहेर काढत असताना त्यांना कोल्हापूरात येता येणार नाही, असं पोलीस सांगताहेत. राज्यात लोकशाही संपली आहे का? कशाच्या आधारे तुम्ही त्यांना ताब्यात घेणार आहात? सोमय्यांना थांबवल्यानं काही फरक पडत नाही, ते दोन मुद्दे मांडणार आहेत आणि ते मांडतील. आता युपी-बिहारमध्ये गुंडशाही, दडपशाहीचं सर्व सुरळीत झालं आहे ते आता तुम्हाला इकडे आणायचं आहे का? असा सवालही यावेळी चंद्रकात पाटील यांनी ठाकरे सरकारला केला.

Chandrakant Patil
सुखजिंदर रंधवांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ? अधिकृत घोषणा बाकी

"संपूर्ण महाराष्ट्रात आता आणीबाणी अधिकृतरित्या घोषीत करायची राहिलीए. ती करुन टाका आणि सर्वांना अटक करुन टाका. इंदिरा गांधींनी तो प्रयोग केला होता. १० लाख लोकांना अटक केली होती. पण त्यानं काय फरक पडला? सत्य दाबून ठेवता येणार नाही, त्यामुळे सोमय्या यांनी जे मांडलंय त्याचा तुम्ही प्रतिवाद करा. सोमय्यांनी सांगितलेल्या त्या कंपन्या कलकत्याच्या मार्केटमध्ये कुठे आहेत? ते दाखवा. हे तर काही नाही, हे हिमालयाचं टोक आहे. यामध्ये आणखी दोन विषय असे आहेत जे सोमय्या बाहेर काढणार असल्याच हसन मुश्रीफ यांना कळलंय म्हणून त्यांनी ही कारवाई केली. हसन मुश्रीफांच्या घरी इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणला गेला, त्यावेळी संबंधीतांवर कारवाई झाली नाही, पण सोमय्यांवर झाली का?" असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

Chandrakant Patil
उत्तराखंडमध्ये 'आप'चे सरकार आल्यास स्थानिकांना 80 टक्के आरक्षण

किरीट सोमय्या हे कोल्हापूरला जाणार आहेत आणि त्यांना झेड सिक्युरिटी आहे. त्यामुळे त्यांना विरोध होणार असेल तर ती पोलिसांची जबाबदारी आहे. आज त्यांना जाऊ दिलं नाही तरी ते उद्या कोर्टात जातील, त्यांना मी तशा सूचना दिल्या आहेत. सोमय्या तिथं दाद मागतील. मग कोर्ट सांगेल तेव्हा तुम्ही काय कराल?, असं प्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com