सोमाटण्यात वाहतूक नियोजन हवे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

बेबडओहोळ - सोमाटणे चौक परिसरातील रस्त्यावर भाजी विक्रेता व अनेक खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी केलेले अतिक्रमण व बेफिकिरीने लावली जाणारी वाहने यामुळे या रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना अडथळा निर्माण होत आहे. सोमाटणे चौक सध्या पवन मावळातील अत्यंत महत्त्वाचा व मोठा चौक आहे. त्यामुळे त्यादृष्टीनेच येथील वाहतुकीचे नियोजन करणे गरजेचे आहे.

रोज संध्याकाळी व रविवारी या चौकातील परिसरात रस्त्याच्या कडेला हातगाड्या उभ्या असतात. त्यामुळे स्थानिक वाहनचालकांना व शिरगाव, दारुंब्रे, गोडुंब्रे, साळुंब्रे व परंदवडी येथील ग्रामस्थांना येथून जाताना कोंडीचा त्रास होतो. कोंडीमुळे अनेकजण रस्त्याच्या विरुद्ध दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत. या चौकाजवळच मोठे रुग्णालय असल्याने येथे वाहनांची वर्दळ असते. अनेकजण बेफिकिरीने रस्त्यावर वाहने लावतात. त्याचा वाहतुकीस अडथळा होतो. चौकात वाहतूक पोलिस असूनही अशा पद्धतीने गाड्या लावणाऱ्यांवर कारवाई करताना दिसत नाहीत.

सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करावी
जुना-मुंबई पुणे महामार्ग व द्रुतगती महामार्गाकडे जाणारी वाहने व येथून बाहेर पडणारी वाहने यांचा मार्ग याच चौकातून जातो. त्यामुळे कोंडी होते. येथे वाहतुकीच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कारवाई व उपाययोजना करणे गरजेचे आहे.

Web Title: Somatane Phata Transport Management