सांगवी, वाकडमध्ये सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकुळ

संदीप घिसे 
बुधवार, 27 जून 2018

पिंपरी, (पुणे) :- वटपौर्णिमेच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या सांगवी, वाकड आणि पाषाण येथील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना बुधवारी (ता. २७) सकाळी घडली. 

वटपौर्णिमेला महिला दागिने घालून घराबाहेर पडतात. यामुळे सोनसाखळी चोरीच्या घटना घडू शकतात ही बाब गृहीत धरून प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळपासून मोठ्या प्रमाणात पोलिसांची गस्त सुरू आहे. तरी देखील सोनसाखळी चोरांनी अवघ्या दोन तासांमध्ये पाच ठिकाणी सोनसाखळी चोरी केली. यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. 

महिलांनी आपल्या अंगावरील दागिन्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Sonakshali thieves in a sanghavi