पोलिस अधीक्षकांनाच रात्रपाळीवरील वाहनांच्या लोकेशनची माहिती मिळणार

मिलिंद संगई
शनिवार, 12 मे 2018

बारामती : रात्रपाळीच्या वेळेस गस्तीवर असलेल्या पोलिस वाहनांना या पुढील काळात नेमून दिलेल्या ठिकाणी रात्रपाळी करावीच लागणार आहे. पोलिस वाहनांना जीपीएस यंत्रणा बसवून घेतल्याने आता पोलिस अधीक्षकांनाच थेट रात्रपाळीवरील प्रत्येक वाहनांच्या लोकेशनची माहिती मिळणार आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांनीच आज बारामतीत पत्रकारांना ही माहिती दिली.

या पूर्वी रात्रपाळीच्या काळात गाडीचे दिवे व सायरन बंद करुन एखाद्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे किंवा कोठेतरी आडोशाला गाडी लावून पोलिस झोप घ्यायचे. आता मात्र बहुसंख्य गाड्यांना जीपीएस यंत्रणा असल्याने प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाडी कोणत्या मार्गावर आहे, त्यांना कोणता मार्ग रात्रपाळीसाठी ठरवून दिलेला आहे याची एकत्रित माहिती उपलब्ध होते. एका विशिष्ट वेळेहून अधिक काळ रात्रपाळीच्या गस्तीचे वाहन एकाच ठिकाणी थांबून राहिले तर लगेचच नियंत्रण कक्षाला त्याची माहिती मिळते व नियंत्रण कक्षातून त्या बाबत संबंधित वाहनाला बिनतारी संदेश वहन यंत्रणेवरुन त्या बाबतची विचारणा होते, त्या मुळे रात्रीच्या गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाली आहे, असे हक यांनी नमूद केले. 

भ्रष्ट कर्मचारी रडारवर...
जिल्ह्यात भ्रष्ट, वारंवार व्यसन करणारे, ज्यांच्या विश्वासार्हतेविषयी शंका आहे असे, लोकांशी चुकीच्या पध्दतीने वागणारे पोलिस कर्मचारी व अधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या रडारवर आहेत. चांगले काम करणा-यांना बक्षीस तर प्रतिमा खराब करणा-यांना शिक्षा असे धोरण ठेवून लोकाभिमुख पोलिसिंग करण्याचा प्रयत्न करत असल्याचे हक म्हणाले.

Web Title: sp get information about all petroling vehicles