लोहगाव विमानतळासाठी आणखी जागा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

महापालिका निवडणुकीत मिळालेले यश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे मिळाले. महापालिकांचा कारभार पारदर्शक राहावा, यासाठी अधिकाऱ्यांची समिती व उपलोकायुक्त नेमण्याचा त्यांना निर्णयही अभिनंदनीय आहे. पुण्यात स्मार्ट सिटी अंतर्गत चांगली कामे सुरू झाली आहेत. अनेक विकासकामे येत्या पाच वर्षांत पूर्ण होतील. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. 
- अनिल शिरोळे, खासदार 

पुणे - लोहगाव विमानतळाला आणखी 16 एकर जागा देण्याचे संरक्षण खात्याने मान्य केल्याने, पुणेकरांना विमानाने जाण्याची चांगली सुविधा मिळू शकेल, असे खासदार अनिल शिरोळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यामुळे येत्या पाच वर्षांत पुण्याच्या विकासाला चांगली दिशा मिळेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

विमानतळाबाबत माहिती देताना शिरोळे म्हणाले, ""सध्या विमानतळ 26 एकर जागेवर आहे. गेल्यावर्षी हवाई दलाने 15.84 एकर जागा टर्मिनल बिल्डिंग आणि विमान पार्किंगसाठी उपलब्ध करून दिली. त्याची कामे सुरू झाली असून, मार्च 2018 पर्यंत ती पूर्ण होतील. लोहगाव विमानतळाच्या विकास कामांसाठी आणखी 16 एकर जमीन देण्याचे हवाईदलाने गेल्या महिन्यात तत्त्वतः मान्य केले. त्यामुळे 32 एकर जादा जागा विमानतळ प्राधिकरणाला मिळेल. त्या बदल्यात राज्य सरकारने 16 एकर जागा हवाई दलाला उपलब्ध करून द्यावयाची आहे. 16 एकरमधील सध्या वापरात असलेल्या इमारती व अन्य व्यवस्था विमानतळ प्राधिकरणाकडून अन्य जागी उभारून हवाई दलाला द्याव्या लागतील.'' 

""या अतिरिक्त जागेमुळे कार्गो टर्मिनल, नवीन प्रवासी टर्मिनल, विमानांचे पार्किंग या सुविधा उपलब्ध होतील. 2014-15 मध्ये पुण्यातून 41 लाख प्रवास, गेल्या वर्षी 54 लाख प्रवासी, तर यंदा 66 लाख प्रवासी क्षमता झाली आहे,'' अशी माहिती त्यांनी दिली. 

महापालिका निवडणुकीत मिळालेले यश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे मिळाले. महापालिकांचा कारभार पारदर्शक राहावा, यासाठी अधिकाऱ्यांची समिती व उपलोकायुक्त नेमण्याचा त्यांना निर्णयही अभिनंदनीय आहे. पुण्यात स्मार्ट सिटी अंतर्गत चांगली कामे सुरू झाली आहेत. अनेक विकासकामे येत्या पाच वर्षांत पूर्ण होतील. त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. 
- अनिल शिरोळे, खासदार 

Web Title: space for lohagava airport