'स्पार्कटेक 2017'ला विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 फेब्रुवारी 2017

पुणे - "सकाळ'च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) आणि अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चतर्फे "स्पार्कटेक 2017' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम झाला.

यामध्ये विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी तांत्रिक आणि इतर उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन आपले कौशल्य अजमावले. कार्यक्रमाचे उद्‌घाटन परिषदेच्या सरचिटणीस प्रमिला गायकवाड व प्राचार्य सुनील ठाकरे यांच्या हस्ते झाले. महाविद्यालयातील प्रत्येक विभागातर्फे एकूण 21 उपक्रम घेण्यात आले. त्यापैकी तांत्रिक आणि नॉन टेक्‍निकल उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी "हाय हाय' या पथनाट्याचे सादरीकरण केले. या पथनाट्यांमध्ये "तृतीयपंथीयांच्या समस्या आणि सद्यःस्थिती' हा विषय हाताळण्यात आला.

या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन प्रा. सायली कोकणे, प्रा. स्नेहा साळवेकर, प्रा. संदीप राऊत, प्रा. अनिल लोहार, प्रा कुणाल ठाणेकर यांनी केले होते. विद्यार्थी प्रतिनिधी वृषभ राखडे याने मनोगत व्यक्त केले, तर शिवानी जाधव हिने आभार मानले मानले.

Web Title: sparktech-2017 response by student