वृक्षलगवडीची वरसगाव धरण परिसरात विशेष मोहीम

राजेंद्रकृष्ण कापसे 
गुरुवार, 5 जुलै 2018

खडकवासला :" जलयुक्त शिवार नंतर वृक्ष लागवड करून पाण्याची बचत करण्यासाठी धरणाच्याकडेला बांबू सारख्या मोठ्या होणाऱ्या झाडांची लागवड केल्यास त्या झाडांमुळे डोंगर उतारावरील माती पाणी वाहून जाणार नाही. अशी मोहीम आम्ही वरसगाव धरणाच्या परिसरात अशी विशेष मोहीम हाती घेतली आहे." अशी माहिती खासदार अनिल शिरोळे यांनी दिली. 

राज्य सरकारच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम अंतर्गत वरसगाव धरण परिसरात हा कार्यक्रम आयोजित केला होता. विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, खासदार अनिल शिरोळे, मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, पाटबंधारेचे अधीक्षक अभियंता सं.द.चोपडे, रोजगार हमी योजनेचे उपायुक्त अजित पवार, कार्यकारी अभियंता पांडुरंग शेलार, कृषीविभागाचे जिल्हा अधीक्षक विनायक औटे, उपवनसंरक्षक लक्ष्मी, सहाय्यक उप वनसंरक्षक आशा भोंग, वेल्हा तहसीलदार प्रदीप उबाळे, गटविकास अधिकारी मनोज जाधव आदी उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, भगवान पासलकर, सुनील जगडे, सुषमा जागडे, हे स्थानिक नागरिक उपस्थित होते. वरसगावचे शाखा अभियंता टी.डी. पाटील व यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Web Title: A special campaign in Varasgaon dam area of tree plantain