केरळच्या पूरग्रस्तांसाठी विशेष प्रार्थना

प्रफुल्ल भंडारी
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

दौंड (पुणे) : केरळ येथील महापुरामुळे विस्थापित झालेल्यांचे संसार पुन्हा उभे राहावे, याकरिता दौंड येथील ईदगाह मैदानावर विशेष प्रार्थना करण्यात आली. 

दौंड (पुणे) : केरळ येथील महापुरामुळे विस्थापित झालेल्यांचे संसार पुन्हा उभे राहावे, याकरिता दौंड येथील ईदगाह मैदानावर विशेष प्रार्थना करण्यात आली. 

दौंड शहरात आज (ता. 22) ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त भीमा नदीकाठी असलेल्या ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज पठणानंतर धर्मसंदेश देताना शाही आलमगीर मशिदीचे मौलाना नुमान रझा यांनी ही प्रार्थना केली. ते म्हणाले, ईद-उल-अजहा निमित्त प्रेषित महंमद पैगंबर यांचे विचार व तत्वांचा अंगीकार करण्याची नितांत आवश्यकता आहे. प्रेषितांच्या अनुयायांकडून काही चुका झाल्या असल्यास त्यांना क्षमा व्हावी. अडचणीत असलेल्या नागरिकांची मदत करण्यासह सर्वांना प्रगतीचे मार्ग दाखवावे. समाजात सौख्य व सौहार्द नांदावे, सुबत्ता अवतरावी आणि प्रत्येकाचा सर्वांगीण विकास व्हावा. युवा पिढीला सुबुध्दी द्यावी. 

केरळ येथील महापुरामुळे मोठी हानी झाली असून पूरग्रस्तांचे जीवन पूर्वपदावर येण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. आमदार राहुल कुल, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात, दौंड अर्बन बँकेचे अध्यक्ष प्रेमसुख कटारिया, नगरसेवक इंद्रजित जगदाळे यांच्यासह राजकीय पक्ष व संघटनांचे पदाधिकारी, आदी ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. 

Web Title: Special prayer for flood victims of Kerala