जाणून घ्या दिवाळीनिमित्त पुण्यातून कोठे धावणार विशेष रेल्वे गाड्या

Railway
Railway

पुणे - दिवाळीनिमित्त मध्य रेल्वे प्रशासनाने पुणे ते दानापूर आणि पुणे ते बल्लारशाह दरम्यान १० विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाकडून पुणे ते दानापूर दरम्यान विशेष ८ गाड्या सोडण्यात येणार आहेत.

या गाडीला नगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, अलाहाबाद जंक्‍शन, मिर्झापूर, पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्‍शन, बक्‍सर आणि आरा स्थानकावर थांबे देण्यात आले आहेत. तसेच या गाडीस दोन एसी ३ टियर, १४ शयनयान श्रेणी आणि ६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्यात आले आहेत. याबरोबरच पुणे ते बल्लारशाह दरम्यान दोन विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ही गाडी नगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, शेगाव, अकोला, वडनेर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, वरोरा आणि चंद्रपूर स्थानकावर थांबणार आहे.

गाडीला एक एसी, १२ शयनयान श्रेणी आणि ६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्यात आले आहेत. या दोन्ही गाड्यांचे तिकीट बुकिंग सर्व रेल्वे स्थानकावर उपलब्ध असून रेल्वेच्या संकेतस्थळावर देखील ते उपलब्ध करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com