विशेष मतदार नोंदणी अभियान उद्यापासून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019

पुणे - पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील सर्व मतदान केंद्रांवर येत्या २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. याबाबतचा आदेश विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

सर्व मतदान केंद्रांवर मतदार यादी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचा लाभ घेऊन मतदार यादीत नाव असल्याची नागरिकांनी खात्री करून घ्यावी. नाव नोंदणीसाठी फॉर्म क्रमांक ६, नाव वगळण्यासाठी फॉर्म क्रमांक ७, मतदार यादीतील नावात किंवा तपशिलात दुरुस्तीसाठी फॉर्म क्रमांक ८ आणि स्थानांतरासाठी फॉर्म क्रमांक ८ अ मतदान केंद्रावर उपलब्ध करून दिले आहेत.

मतदानाचा हक्क बजावताना मतदान ओळखपत्र हे केवळ ओळख पटविण्यासाठी उपयोगी आहे. मतदार यादीत नाव असेल तरच मतदान करता येणार आहे. सर्व राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी मतदान केद्रांवरील सहायकांमार्फत (बीएलए) पात्र मतदारांची नोंदणी करावी, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी तरुण-तरुणींनी आणि पात्र मतदारांनी या अभियानात नाव नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Special Voter Registration Campaign