Devendra Fadnavis : "तुम्ही सांगा...मी पद सोडतो, वर्षभरासाठी घरही सोडतो" जे.पी. नड्डांसमोरच फडणवीस असं का म्हणाले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : "तुम्ही सांगा...मी पद सोडतो, वर्षभरासाठी घरही सोडतो" जे.पी. नड्डांसमोरच फडणवीस असं का म्हणाले?

Devendra Fadnavis : भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी व उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना देखील आगामी निवडणुकांसाठी तयार राहण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी पक्षासाठी त्याग करण्याची सुचना केली.

देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासमोर केलेले त्यागाचे वक्तव्य ऐकून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री करण्याचा सुचना केंद्राने दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची चर्चा होती. यावेळी फडणवीस यांनी सरकारच्या बाहेर राहून काम करण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या त्यागाची चर्चा रंगली होती.

आज जे.पी. नड्डा यांच्यासमोर फडणवीस यांनी आक्रमक भाषण केले. यावेळी  सी. टी. रवी, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रावसाहेब दानवे, आशीष शेलार, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, सुनील देवघर, विजया रहाटकर अनेक नेते उपस्थित होते.

फडणवीस काय म्हणाले?

कोणतीही लालसा न ठेवता कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करावं. तसेच पक्षासाठी आपल्याला त्याग करायचा असून तुम्ही सांगितलं तर मी कशाचाही त्याग करायला तयार आहे, पद सोडायला तयार आहे, तुम्ही म्हणाल तर मी वर्षभरासाठी घरही सोडायला तयार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आपला फॉर्म्युला मोदीजींची कार्यशैली. आपला नरेटिव्ह सामान्यांच्या विकासाचा असल्याचे फडणवीस म्हणाले. 2023 चे शेवटचे 6 महिने, 024 चे पहिले 6 महिने हेच आपले ध्येय असली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी झोकून दिले पाहिजे. एकाचवेळी अनेक कामे करा, संघटनेत संपर्क, सरकार-जनता संवाद सेतू, सरकारची कामे तर पोहोचवा, असे फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.