प्रलंबित विकासकामांना गती देणार - चंद्रकांत दळवी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

पुणे - जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि नगरपरिषदांमधील केंद्र व राज्यशासनाच्या निधीमधून जी कामे सुरू आहेत. त्यांचा आढावा घेण्यासाठी तसेच प्रलंबित विकासकामे गतिमान करण्यासाठी दर महिन्याला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिली.

सध्या जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपालिका क्षेत्रातील अनेक विकासकामे रखडलेली आहेत. त्याची यादी तयार करून सद्यःस्थिती पाहिली जाईल. पायाभूत विकासाची किती कामे निधीअभावी कामे रखडली त्याचा आढावा घेऊन राज्यशासनाला अहवाल पाठविण्यात येईल. पुणे विभागीय स्तरावर जिल्हा परिषदांवर जिल्हाधिकारी कार्यालयांकडून सहकार्य केले जाते. परंतु नगरपरिषदा, नगरपालिका यांच्या प्रलंबित विकासकामांना गती देण्याची गरज आहे. 

केंद्र व राज्यसरकारच्या निधीतून जी विकासकामे केली जात आहेत. त्याचा प्रत्येक महिन्याला आढावा घेतला जाईल. त्यासाठी नगराध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन प्रलंबित कामांना गती देण्यासाठी राज्यसरकारकडे व्यक्तिशः पाठपुरावा करणार आहे, असेही विभागीय आयुक्त दळवी यांनी सांगितले.

पुणे विभागीय आयुक्तालयाच्या अधिकारक्षेत्रातील राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या कामांचा सद्यःस्थितीचा आढावा घेतला जाईल. त्यामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन त्याचा अहवाल राज्यशासनाकडे पाठविण्यात येईल.
- चंद्रकांत दळवी, विभागीय आयुक्त

Web Title: Speed up pending development works