Datuk Ramli Ibrahim
Datuk Ramli Ibrahim

कला शिकण्यासाठी यूट्यूबपेक्षा आत्मा महत्त्वाचा : दतुक रामली इब्राहिम 

पुणे : यू-ट्यूब किंवा सोशल मीडियाद्वारे कोणतीही कला अवगत करता येत नाही. कोणतीही कला शिकण्यासाठी तुमचा आत्मा, शरीर, भावना त्यामध्ये गुंतायला हव्यात. असे मत भरतनाट्यम व ओडिसा या शास्त्रीय नृत्यांची कला अवगत असणारे दतुक रामली इब्राहिम यांनी व्यक्त केले. 

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कट्टा या कार्यक्रमा अंतर्गत दतुक रामली इब्राहिम यांच्याशी वार्तालाप करण्यात आला. यावेळी गुरु बिचित्रनंद सुद्धा उपस्थित होते. इब्राहिम हे मलेशियात जन्मलेले असून अधुनिक नृत्यशैलीबरोबरच भरत-नाट्यम आणि ओडिशा या भारतीय शास्त्रीय नृत्यांची कला अवगत करत जगभरात अनेक प्रयोग करून गेली 40 वर्षे नृत्यांचे प्रशिक्षण देत आहेत. तसेच त्यांना संगीत नाटक अकादमी आणि भारताच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

यावेळी ते बोलताना म्हणाले, "योगा, आयुर्वेद, शास्त्रीय कला यांबाबत भारताची जगामध्ये अतिशय चांगली प्रतिमा आहे. मुस्लिम असूनही हिंदू शास्त्रीय कला अवगत करण्यासाठी कोणतीही अडचण आली नाही. तसेच कला अवगत करण्यासाठी कोणात्याही सीमारेषा नसतात." कला आणि सोशल मीडियावर बोलताना ते म्हणाले, "जर खऱ्या अर्थाने कला, संस्कृती शिकायची असेल तर त्याला पुरेसा वेळ देऊन ती आत्मसात करावी लागते. यू-ट्यूब किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ती शिकता येत नाही. कलेसाठी समर्पित होणे नेहमी गरजेचे असते. संगीत, नृत्य यांसारखे कलेचे विषय अभ्यासक्रमात घेण्यासाठी काही शाळा महाविद्यालयांनी सुरवात केली आहे. हळू-हळू त्यामध्ये वाढ होईल." 

पद्मश्रीपेक्षा संगीत नाटक अकादमी पुरस्कार महत्त्वाचा 
"मला मिळालेल्या पद्मश्री पुरस्कारापेक्षा संगीत नाटक अकादमी पुरस्कार जास्त महत्त्वाचा वाटतो. कारण पद्मश्री पुरस्काराला राजकीय वलय असते. परंतु संगीत नाटक अकादमी पुरस्काराची निवड फक्त कलाकारांकडून होत असते." असेही इब्राहिम यांनी नमूद केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com