पिचकारी बहाद्दर दंडाचे धनी

Pune-Municipal
Pune-Municipal

पुणे - रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर महापालिकेने जोरदार कारवाई सुरू ठेवली आहे. गेल्या आठवड्यात दीडशेहून अधिक जणांकडून दंड वसूल केला आहे.
केंद्राने एप्रिल २०१६पासून घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केले आहे. या नियमानुसार महापालिकेने कारवाईला सुरवात केली आहे. यासंदर्भात जाहीर सूचनाही महापालिकेने केली आहे. रस्त्यावर घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, उघड्यावर शौच करणे आदींकडून दीडशे ते पाचशे रुपयांपर्यंत दंड वसुलीचा अधिकार या नियमानुसार महापालिकेला मिळालेला आहे. या नियमाची अंमलबजावणी आणि शहरात अस्वच्छता करणाऱ्यांना जरब बसविण्यासाठी गेल्या आठवड्यापासून कारवाई जोरात सुरू केली आहे. यात सध्या रस्त्यावर थुंकणाऱ्यांना लक्ष केले जात आहे. त्यांच्याकडून थुंकलेली जागा पाणी आणि कापडाने साफ करून घेतली जाते. त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे.

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार प्लॅस्टिकबंदीची अंमलबजावणी केली जात आहे. प्लॅस्टिकचा कचरा आणि त्यापासून निर्माण होणारे प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. प्रत्येक क्षेत्रीय आणि मध्यवर्ती कार्यालयामार्फत एक पथक कारवाई करीत आहे. पाच, पंधरा आणि पंचवीस हजार रुपये असा दंड संबंधितांकडून वसूल केला जात आहे.

याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, ‘‘अस्वच्छता निर्माण करणाऱ्यांविरुद्ध पुढील काळात आणखी तीव्र कारवाई केली जाईल. रस्त्यावर थुंकणाऱ्या १६० नागरिकांकडून दंड वसूल केला आहे. ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण करून देणारे, शंभर किलोपेक्षा अधिक कचरा निर्माण होणाऱ्या गृहप्रकल्पांनी त्यांच्या आवारातच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासचे आदेशही दिले आहेत.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com