रस्त्यावर थुंकताय, सावधान! महापालिकेकडून साठ जणांवर कारवाई 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 नोव्हेंबर 2018

पुणे : रस्त्यावर थुंकाल, तर तुम्हालाच आता ते पुसावे लागेल आणि शंभर रुपये दंडही भरावा लागेल. सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा किंवा तंबाखू खाऊन अस्वच्छता करणाऱ्या साठ जणांवर महापालिकेने कारवाई केली. 

पुणे : रस्त्यावर थुंकाल, तर तुम्हालाच आता ते पुसावे लागेल आणि शंभर रुपये दंडही भरावा लागेल. सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा किंवा तंबाखू खाऊन अस्वच्छता करणाऱ्या साठ जणांवर महापालिकेने कारवाई केली. 

महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत गेल्या तीन दिवसांपासून रस्त्यावर थुकंणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. बिबवेवाडी, टिळक रस्ता, औंध, विश्रांतवाडी क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही मोहीम राबविली. या मोहिमेत उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक हेदेखील सहभागी झाले आहेत. रस्त्यावर थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे आदींबाबत महापालिकेकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते. मात्र तरीही नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केली जात आहे. यामुळे महापालिकेने जनजागृतीबरोबरच धडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. 

याबाबत उपायुक्त ज्ञानेश्‍वर मोळक म्हणाले, ""साठहून अधिक नागरिकांवर महापालिकेने कारवाई केली आहे. यामध्ये उच्च शिक्षितांपासून ते रिक्षाचालक, टेम्पोचालक अशा सर्वांचा समावेश आहे. महापालिकेचे कर्मचाऱ्यांना एखादी व्यक्ती रस्त्यावर थुंकताना आढळली, तर त्या व्यक्तीला पाण्याची बाटली आणि फडके देऊन रस्ता साफ करण्यास सांगितले जाते.'' 

Web Title: Spit on the road be careful Thousands of action taken by Municipal Corporation