‘डीएसएसएल’ स्पर्धेला महाराष्ट्रात विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

Online-Quiz-Competition
Online-Quiz-Competition

पुणे - शालेय विद्यार्थ्यांत अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग’ (डीएसएसएल) या आंतरशालेय प्रश्‍नमंजूषा स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ‘बायज्यूज’ आणि ‘डिस्कव्हरी’ यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला आहे. या ऑनलाइन क्विझमध्ये आत्तापर्यंत अनेकांनी नोंदणी केली असून, तुमच्या शाळेची नोंदणी नसल्यास आजच शाळेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्याच्या कठीण काळात शिकायला मदत करण्यासाठी आणि त्यात उत्तम बनण्यासाठी बायजूजकडून दोन महिन्यांचे विनामूल्य सबस्क्रिप्शनसुद्धा मिळणार आहे. डीएसएसएलमध्ये सहभागी झाल्यावर विद्यार्थ्यांना हे सबस्क्रिप्शन मिळेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पहिल्या तीन विजेत्या संघांतील विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांसह नासाला भेट देण्याची संधी, दहा लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे यांसह अनेक पारितोषिकांची लयलूट स्पर्धेत असून, चौकस विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेचे आणि माहितीचे दर्शन घडवण्याची चांगली संधी उपलब्ध होणार आहे.

‘डीएसएसएल’मध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यालासुद्धा हमखास पारितोषिके मिळणार असल्याने ही मोठी संधी असेल. या स्पर्धेत सहभाग पूर्णपणे निःशुल्क असेल. विद्यार्थ्यांनी सहभागासाठी आपल्या शाळांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. 

‘डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग’ ही विद्यार्थ्यांची तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता (क्रिटिकल थिंकिंग) आणि मानसक्षमता (ॲप्टिट्यूड) यांच्यावर आधारित सामान्य ज्ञानाची स्पर्धा आहे. यात विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धा करून स्वतःबरोबरच शाळेचेही नाव उज्ज्वल करण्याची संधी मिळते. यापूर्वीच्या सीझन्समध्ये तब्बल सतरा हजार शाळांतील साठ लाख विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. यंदा ही स्पर्धा ऑनलाइन आयोजित केली जाणार आहे.  

स्पर्धा एकूण तीन गटांत असेल. पहिल्या गटात तिसरी आणि चौथीचे विद्यार्थी, दुसऱ्या गटात पाचवी ते सातवीचे विद्यार्थी आणि तिसऱ्या गटात आठवी ते दहावीचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. स्पर्धेच्या तीन फेऱ्या असतील. पहिली फेरी शालेय स्तरावर असून, तिच्यात सहभागी होण्याची संधी तुम्हाला आहे. दुसऱ्या फेरीत शालेय स्तरावरचे विजेते सहभागी होऊ शकतील.

तिसऱ्या राष्ट्रीय स्तरावरील फेरीत वेगवेगळ्या राज्यांतील विजेते त्यांच्या राज्यांचे प्रतिनिधित्व करतील आणि या फेरीचे प्रसारण डिस्कव्हरी वाहिनीवर सहा एपिसोड्‌समध्ये होईल. पहिली फेरी मल्टिपल चॉइस प्रश्‍नमंजूषा असून, विद्यार्थ्यांना वीस प्रश्‍नांची उत्तरे अर्ध्या तासात द्यावी लागतील. 

प्रत्येक शाळेतील तीन विजेते दुसऱ्या फेरीत जातील. दुसऱ्या फेरीतही मल्टिपल चॉइस प्रश्‍नमंजूषा असेल. प्रत्येक राज्यातील दोन विजेते तिसऱ्या फेरीत प्रवेश करतील. तिसऱ्या फेरीचे डिस्कव्हरी वाहिनीवर प्रक्षेपण होणार आहे. या फेरीचे चित्रीकरण मुंबईत होणार असून, ही फेरी ‘डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग’ या नावाने प्रक्षेपित केली जाईल. 

अशी असतील बक्षिसे

  • पहिल्या तीन विजेत्या संघांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या मुख्याध्यापकांसह ‘नासा’ला भेट देण्याची संधी मिळेल. विजेत्यांना दहा लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करण्याची संधी मिळेल. 
  • याचबरोबर डिस्कव्हरीवर प्रक्षेपित झालेल्या प्रत्येक एपिसोडमधील विजेत्यांना ‘बायज्यूज’चा एक वर्षाचा अभ्यासक्रम मिळणार आहे. 
  • ‘डीएसएसएल’मध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यालासुद्धा अनेक गोष्टी मिळणार आहेत. 
  • पाच हजार रुपयांची बायज्यूस अभ्यासक्रमासाठीची शिष्यवृत्ती; क्रिटिकल थिंकिंग आणि ॲप्टिट्यूड यांचे सखोल विश्‍लेषण. ‘बायज्यूज’ या लर्निंग ॲपचा साठ दिवसांसाठीचा विनामूल्य ॲक्‍सेस आणि सहभाग प्रमाणपत्र मिळेल. 

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी ‘सकाळ’ने नेहमी पुढाकार घेतला आहे. चित्रकला स्पर्धेसारखे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत झाली आहे, तसेच याचा पुढील आयुष्यातही त्यांना लाभच झालेला आहे. आता देखील ‘सकाळ’ने सुरू केलेला ‘डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग’ हा उपक्रम स्तुत्य आहे. विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. 
- ॲड. एस. के. जैन, अध्यक्ष, नियामक मंडळ, शिक्षण प्रसारक मंडळी

ऑनलाइन क्विझमध्ये अनेकांकडून नोंदणी 
शाळेची नोंदणी नसल्यास आजच शाळेशी संपर्क साधा 
भरपूर बक्षिसे जिंकण्याची संधी

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com