esakal | 'डीएसएसएल' स्पर्धेला महाराष्ट्रात विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
sakal

बोलून बातमी शोधा

DSSL

शालेय विद्यार्थ्यांत अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग’ (डीएसएसएल) या आंतरशालेय प्रश्‍नमंजूषा स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ‘बायजूज’ आणि ‘डिस्कव्हरी’ यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला आहे. या ऑनलाइन क्विझमध्ये आत्तापर्यंत अनेकांनी नोंदणी केली असून, तुमच्या शाळेची नोंदणी नसल्यास आजच शाळेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

'डीएसएसएल' स्पर्धेला महाराष्ट्रात विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - शालेय विद्यार्थ्यांत अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या ‘डिस्कव्हरी स्कूल सुपर लीग’ (डीएसएसएल) या आंतरशालेय प्रश्‍नमंजूषा स्पर्धेला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ‘बायजूज’ आणि ‘डिस्कव्हरी’ यांनी ‘सकाळ माध्यम समूहा’च्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित केला आहे. या ऑनलाइन क्विझमध्ये आत्तापर्यंत अनेकांनी नोंदणी केली असून, तुमच्या शाळेची नोंदणी नसल्यास आजच शाळेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्याच्या कठीण काळात शिकायला मदत करण्यासाठी आणि त्यात उत्तम बनण्यासाठी बायजूजकडून दोन महिन्यांचे विनामूल्य सबस्क्रिप्शनसुद्धा मिळणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना हे सबस्क्रिप्शन मिळेल. ज्या शाळांना सहभाग नोंदविलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर नावनोंदणी करावी.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी असतील बक्षिसे

  • पहिल्या तीन विजेत्या संघांतील विद्यार्थ्यांना त्यांच्या मुख्याध्यापकांसह ‘नासा’ला भेट देण्याची संधी मिळेल. विजेत्यांना दहा लाख रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे मिळणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे आणि शाळेचे नाव उज्ज्वल करण्याची संधी मिळेल. 
  • याचबरोबर डिस्कव्हरीवर प्रक्षेपित झालेल्या प्रत्येक एपिसोडमधील विजेत्यांना ‘बायजूज’चा एक वर्षाचा अभ्यासक्रम मिळणार आहे. 
  • ‘डीएसएसएल’मध्ये प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यालासुद्धा अनेक गोष्टी मिळणार आहेत. 
  • पाच हजार रुपयांची बायजूज अभ्यासक्रमासाठीची शिष्यवृत्ती; क्रिटिकल थिंकिंग आणि ॲप्टिट्यूड यांचे सखोल विश्‍लेषण. ‘बायजूज’ या लर्निंग ॲपचा साठ दिवसांसाठीचा विनामूल्य ॲक्‍सेस आणि सहभाग प्रमाणपत्र मिळेल. 

फीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत

शानू पटेल हायस्कूल शाळेत पाचवी ते नववीसाठी मागील दोन वर्षांपासून डिस्कव्हरी व बायजूजतर्फे घेतली जाणारी स्पर्धा आयोजित केली जाते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या जनरल नॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात ‘सकाळ’ने बायजूजबरोबर आयोजित केलेली स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरली.
- महादेव मारुती जाधव, मुख्याध्यापक, शानू पटेल हायस्कूल, वारजे

सध्याच्या कोरोनाच्या काळात प्रत्येक जण ऑनलाइन शिक्षण घेत असताना डिस्कव्हरी बायजूज ॲपचा उपयोग होतो आहे. या ऑनलाइन क्वीझ स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्‍वासात मोठी वाढ होते आहे. या ॲपमुळे अभ्यासातील विविध संकल्पनाही स्पष्ट होतात. मला स्वतःला हे ॲप खूप आवडते. धन्यवाद सकाळ. 
- अश्‍विनी प्रमोद शेलार, प्राचार्य, आंध्र हायस्कूल, डेक्कन जिमखाना, पुणे

गेल्या अनेक वर्षांपासून डिस्कव्हरी वाहिनी आणि ‘बायजूज’ यांच्या संयुक्त प्रयत्नातून प्रश्नोत्तरांच्या चाचणीचे (क्वीझ) आयोजन केले जात आहे. त्यात आमची शाळा गेली ३ वर्षे सातत्याने सहभागी होते आहे. या वर्षी या प्रश्नोत्तरांच्या चाचणीचे आयोजन प्रथमच ऑनलाइन पद्धतीने केले गेले. या आधुनिक पद्धतीचा अवलंब आम्ही सहजरीत्या करू शकतो, हे दाखवून दिले. क्वीझमध्ये आमच्या शाळेतील २४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. अशा प्रकारच्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, तसेच आधुनिक युगातील विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठीची मानसिकता निर्माण होण्यास मदत होते. धन्यवाद.
- सौ. निधी सामंत,  मुख्याध्यापिका महाराष्ट्रीय मंडळ, इंग्रजी माध्यम शाळा, टिळक रस्ता, पुणे. 

अप्पर इंदिरानगर येथील ब. रा. अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वकर्मा विद्यालय इंग्रजी प्राथमिक शाळेत बायजूजतर्फे राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये ५३० विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्याला आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला. विश्वकर्मा विद्यालयाची स्वतःची VOLP प्लॅटफॉर्म वेबसाइट असल्यामुळे मुलांना ही परीक्षा देण्यास खूप सोपे गेले. या परीक्षेमध्ये मुलांना सामाजिक, बौद्धिक व शैक्षणिक विषयाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले गेले. ‘बायजूज’तर्फे या परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
- श्रद्धा येरोलकर, मुख्याध्यापक, विश्‍वकर्मा विद्यालय

बायजूज दर्जेदार शिक्षणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याची शिकवण्याची पद्धत जबरदस्त आहे. या प्लॅटफॉर्मवर विद्यार्थ्यांच्या संकल्पना व्हिडिओ पाहून, विविध स्पर्धा व क्वीझच्या माध्यमातून स्पष्ट होत असून, त्यांना तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शनही मिळत आहे. 
- डॉ. अब्राहम जहागीरदार, प्राचार्य, एमसीईएस इंग्लिश स्कूल, आझम कॅम्पस, पुणे

महेश विद्यालयाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बायजूजतर्फे ‘सकाळ’ने परीक्षांचे आयोजन केले होते. मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना देणाऱ्या, तसेच त्यांचा आत्मविश्वास उंचावणाऱ्या या परीक्षांमुळे कोरोनाच्या संकट काळातही मुलांमध्ये सकारात्मकता वाढीला लागली. भविष्यातही या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला दिशा मिळून अभ्यासात गोडी निर्माण होईल, हे नक्की. यामुळे  विद्यार्थी भविष्यात येणाऱ्या आव्हानांना यशस्वीरीत्या सामोरे जातील. 
- आश्विनी मुजुमदार , मुख्याध्यापिका महेश विद्यालय इंग्लिश मीडिअम स्कूल, कोथरूड

बायजूजच्या क्वीझमुळे मुलांमध्ये विशिष्ट स्कील विकसित होत आहेत व ते त्यांच्या करिअरसाठी उपयुक्त आहेत. 
- अंजना देशमुख, प्राचार्य, नॅशनल चिल्ड्रेन्स ॲकॅडमी, वडगावशेरी, पुणे. 

Edited By - Prashant Patil