मंचरमध्ये 'मैत्रीण तुमच्या जीवाभावाची' स्पर्धेस महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

Maitrin-Manchar
Maitrin-Manchar

मंचर - 'सकाळ' माध्यम समूहाच्या वतीने सकाळ व अँग्रोवन मध्ये गुरुवार (ता.५) पासून “मैत्रीण तुमच्या जीवाभावाची” ही अभिनव स्पर्धा महिलांसाठी सुरु झाली आहे. या स्पर्धेचा शुभारंभ  मंचर येथे गोवर्धन दुध प्रकल्पाच्या आवारात करण्यात  आला. यावेळी आंबेगाव तालूक्यातील विविध गावातील ६० महिला सहभागी झाल्या होत्या. 'मैत्रीण तुमच्या जीवाभावाची”  या अभिनव स्पर्धेत सहभागी होणार”अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पराग मिल्क फूड्स ग्रुप,कपासी लक्ष्मी उद्योग समूह, शरद सहकारी बँक, सागी ग्रुप, पंचदीप नवरात्र ग्रुप ,(सर्व मंचर), श्रीराम अँग्रो ग्रुप (कळंब-नांदूर), जँक मेडिको ग्रुप (लांडेवाडी) या सात ग्रुपमधील महिला सात रंगाच्या साड्या परिधान करून सहभागी झाल्या होत्या. 

'सकाळ”चे सहायक वितरण व्यवस्थापक योगेश घाग यांनी या योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. प्रत्येक सहभागी महिलेस हमखास भेटवस्तू मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. शरद सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्योत्स्ना काकडे, गार्गी काळे पाटील, मोहिनी वायाळ, नलिनी वरपे ,सानिका कालेकर, अँड शुभांगी पोटे, मंगल शेवाळे, सुनिता कराळे यांनी सकाळ किवा अँग्रोवनच्या माध्यमातून मैत्रीण स्पर्धेत सर्व महिलांनी सहभागी व्हावे. असे आवाहन केले. गोवर्धन दुध प्रकल्पाचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी या उपक्रमाला शुभेच्या दिल्या. महानंदा वळसे पाटील यांनी आभार मानले.

सोशल डिस्टन्स पाळा, मास्कचा व सॅनिटायझर चा वापर करा, नि पक्षपाती बातम्या, विश्वासार्हता, ताजेपणा, सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग, सर्व घटकांना न्याय देणारा, शेतकऱ्यांचा मित्र, संकटसमयी मदत करणारा सकाळ अँग्रोवन असे फलक ग्रुपच्या प्रमुखांकडे होते.

'सकाळ मध्यम समूहाने सुरु केलेल्या मैत्रीण अभिनव स्पर्धेतून विजेत्यांना  ८ टीव्हीएस. स्कुटी पेप प्लस, २५ सोन्याची ठूशी पाच ग्राम, ५०० चांदीचे नाणे पाच ग्राम, एक हजार फ्राय पँन, २०० पैठणी साडी या आकर्षक बक्षिसानशिवाय सहभागी प्रत्येक स्पर्धकास हमकास लेडीज हँड बँग बक्षीस मिळणार त्यामुळे महिलानी या स्पर्धेत सहभागी व्हावे.
- ज्योत्स्ना काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद सहकारी बँक मंचर.

सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून विधायक उपक्रम नेहमीच राबविताना महिलांना प्राधान्याने संधी दिली जाते. मैत्रीण तुमच्या जीवाभावाची” ही अभिनव स्पर्धा महिलांसाठी आयोजित केली आहे. बक्षीसाप्रमाणेच आवांतर वाचनाची आवड निर्माण होणार आहे. महिलांनी नियमितपणे सकाळ व अँग्रोवानचे वाचन करून स्पर्धेत सहभागी व्हावी. 
- मोहिनी राजेंद्र वायाळ, अध्यक्ष श्रीराम अँग्रो ग्रुप कळंब-नांदूर.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com