शेळगावमध्ये मैदानी स्पर्धेच्या शिबिराचे आयोजन

राजकुमार थोरात
मंगळवार, 17 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : शेळगाव (ता.इंदापूर) येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधुन शांताई विकास प्रतिष्ठान व जे. के. क्रीडा मंच यांच्या संयुक्त विद्यामाने  दहा दिवसांच्या मैदानी शिबिरास सुरवात झाली आहे. 

शांताई विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष व कर्मयोगी चे संचालक आबासाहेब शिंगाडे व जे. के. क्रीडा मंचाचे शिक्षक कैलास जाधव हे गेल्या तीन वर्षापासुन ग्रामीण भागामध्ये खेळाडू घडावेत यासाठी  विविध मैदानी शिबिराचे आयोजन करीत आहेत. शेळगावमध्ये दहा दिवसांच्या मैदानी शिबिरास सुरवात झाली असून शिबिराचे उद्घटान भागवत भुजबळ,माऊली सुतार,,नाना चवरे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरामध्ये योगासने, प्राणायम, गोळा फेक, भाला फेक, थाळी फेक, धावणे, चित्रकला, वक्तृत्व कला, खो-खो, कबड्डीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून १३० मुले शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत. वेळी कर्मयोगी चे संचालक राहुल जाधव, रामदास शिंगाडे,  मारुती सुपुते,भजनदास पवार,भगवान जाधव, नितीन जाधव,मिलिंद जाधव, अशोक शिंगाडे उपस्थित होते.

ग्रामीण भागातील मुलांमध्ये अनेक सुप्त गुण आहेत.तसेच मैदानी स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील मुले राज्यस्तरीय,राष्ट्रीय पातळीवरती सहज यश मिळवू शकतात.यशासाठी त्यांना योग्य मार्गदर्शनाची व सरावाची गरज असुन जास्तीजास्त खेळाडू तयार व्हावेत यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे कर्मयोगीचे सहाकारी साखर कारखान्याचे संचालक आबासाहेब शिंगाडे यांनी सांगितले.

Web Title: sports camp organised in shelgao