बहुद्देशीय क्रीडासंकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

पुणे - महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेले शहरातील पहिल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बहुद्देशीय क्रीडासंकुलाचे काम पूर्ण झाले आहे. या संकुलात एकावेळी सुमारे ५०० नागरिक विविध सामने बघू शकतील. हे संकुल सर्वांसाठी खुले राहणार असून त्याचे उद्‌घाटन शनिवारी (ता. १७) मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

बिबवेवाडीत सीताराम बिबवे शाळेजवळ सुमारे दहा गुंठे जागेत महापालिकेने हे क्रीडा संकुल उभारले आहे. येथे सुमारे पाच हजार चौरस फुटांचा अद्ययावत वातानुकूलित हॉल उभारला आहे. यात बॅडमिंटन, व्हॉलिबॉल, टेबल टेनिस, बास्केटबॉल, कुस्ती, ज्यूदो- कराटे आदींचे सामने होऊ शकतील. त्यासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांना वापरले जाणारे मॅट टाकण्यात आले आहे.

या संकुलाच्या पहिल्या मजल्यावर ध्यानधारणेसाठी सभागृह उभारले आहे. त्याच्यावरील सभागृह अन्य क्रीडा प्रकारांसाठी वापरण्यात येणार आहे. संकुलाच्या बाजूला जॉगिंग ट्रॅक तयार केला आहे. तसेच खेळाडूंना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या, लॉकर, अद्ययावत स्वयंपाक घर उभारण्यात आले आहे. नगरसेविका अस्मिता शिंदे आणि मनसेचे शहर पदाधिकारी विशाल शिंदे यांच्या पाठपुराव्यातून हे क्रीडा संकुल साकारले आहे. त्यासाठी महापालिकेने सुमारे अडीच कोटी रुपये खर्च केले आहे.

संकुलाची वैशिष्ट्ये

पाच हजार चौरस फुटांचा वातानुकूलित हॉल

आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठीच्या मॅटचा वापर

एकावेळी ५०० नागरिक बघू शकतील सामने

संकुलाच्या बाजूला जॉगिंग ट्रॅक

खेळाडूंना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र खोल्या

अद्ययावत स्वयंपाक घर

Web Title: sports complex international quality facility