कासारवाडीत साकारणार क्रीडा संकुल

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जुलै 2018

जुनी सांगवी (पुणे) : कासारवाडी येथील सर्व्हे क्र.४०८ आरक्षण क्रमांक १३ या जागेवर ५५ हजार ३३४.१६ चौरस फुट आकाराच्या मैदानात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध खेळांचे मैदान विकसित करण्यात येणार आहे. या जागेवर फुटबॉल, कबड्डी,क्रिकेट, नेट प्रॅक्टिस, लहान मुलाचे मैदान तसेच जॉगिंग ट्रॅक, महिलांसाठी योगा हॉल, बॅडमिंटन हॉल आणि व्यायाम शाळा उपलब्ध असणार आहे.

या कामासाठी एकुण १३ कोटी ५० लाख ४२९ रुपये खर्च अपेक्षित असून या नियोजित क्रिडा संकुलामुळे परिसरातील खेळाडूंची मैदानाची गरज भागुन उत्तम खेळाडु तयार होण्यास मदत होणार आहे.तरुणांसोबतच जेष्ठांना व महिलांना जॉगिंग ट्रॅकचा लाभ घेता येणार आहे. तसेच लहान मुलांसाठी खेळाचे स्वतंत्र मैदान असणार आहे. स्टेडीयममध्ये फुटबॉलचे मुख्य मैदान असणार आहे. मैदान १२ हजार २७६.८५ चौरस फुट आकाराचे असणार आहे. क्रिकेट नेट प्रॅक्टिसचे क्षेत्र ३ हजार ३७६.७० चौरस फुट, कब्बडीचे मैदान १ हजार ५४९.४४ चौरस फुट, मुलांचे खेळाचे मैदान ८ हजार ८७३.७७ चौरस फुट आणि जॉगिंग ट्रॅकची लांबी ६३९.६ फुट असणार आहे.स्टेडीयम च्या तळमजल्यावर स्वागत कक्ष, लॉकर्स व स्वच्छता गृह  तसेच व्यायाम शाळा, इनडोअर गेम्स हॉल व महिलानासाठी योगा हॉल असणार आहे.  

सध्या या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रशासनाने बि. के. खोसे कंपनीस सदर काम करण्याबाबत करारनामा स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. सदर कामासाठी आम्ही पाठपुरावा केला होता.
- सुजाता पालांडे- नगरसेविका

Web Title: sports complex plan at kasarwadi