क्रीडा विभाग कार्यालयाचे पुन्हा स्थलांतर ? 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

पिंपरी - दोन महिन्यांपूर्वी मासुळकर कॉलनीमध्ये स्थलांतरीत झालेले पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाचे कार्यालयाचे पुन्हा स्थलांतरित होण्याची शक्‍यता आहे. नवीन जागांची पाहणी सुरू झाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कार्यालयाला कायमस्वरूपी जागा नसल्याने स्वत-चा "फुटबॉल' झाल्याची भावना क्रीडा विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

पिंपरी - दोन महिन्यांपूर्वी मासुळकर कॉलनीमध्ये स्थलांतरीत झालेले पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागाचे कार्यालयाचे पुन्हा स्थलांतरित होण्याची शक्‍यता आहे. नवीन जागांची पाहणी सुरू झाली आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कार्यालयाला कायमस्वरूपी जागा नसल्याने स्वत-चा "फुटबॉल' झाल्याची भावना क्रीडा विभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. 

नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमची इमारत धोकादायक झाल्याने क्रीडा विभागाचे कार्यालय स्थलांतरित करण्याचा अहवाल स्थापत्य विभागाने दिला होता. त्यानुसार, अधिकाऱ्यांनी बऱ्याच जागा शोधल्या. मासुळकर कॉलनीतील वास्तुउद्योग येथील तंत्रनिकेतन शाळेची जागा पसंत पडली होती. स्थलांतरापूर्वी इमारतीची डागडुजी आणि रंगरंगोटीही केली. आता दोन महिन्यांनंतर कार्यालय पुन्हा स्थलांतरित होणार असल्याच्या चर्चा आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आयुक्तांनी स्थलांतराबाबतची पूर्वकल्पना वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. क्रीडा विभागाच्या जागेत पोलिस आयुक्तालयाअंतर्गत, पोलिस उपायुक्त अथवा सहाय्यक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांसाठी कार्यालय सुरू करण्याचे विचाराधीन आहे. याखेरीज, तेथे स्मार्ट सिटी कार्यालयासाठीही जागा देण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळेच, क्रीडा विभागाचे स्थलांतर केले जाणार असल्याचे समजते. 

मगर स्टेडियम येथे कार्यालय स्थलांतरित होण्यापूर्वी क्रीडा विभाग पालिकेच्या मुख्य इमारतीत तळमजल्यावर कार्यरत होता. आता, मगर स्टेडियम समोरील नवीन इमारत, मोरया गोसावी क्रीडा संकुल किंवा इतर ठिकाणच्या जागेची नव्याने चाचपणी केली जात आहे. 

मगर स्टेडियममध्येच द्या जागा ! 
अण्णासाहेब मगर स्टेडियमची जागा मध्यवर्ती असून तेथे अजूनही मोकळी जमीन आहे. त्याच ठिकाणी क्रीडा विभागाचे कायमस्वरुपी कार्यालय बांधल्यास खेळाडू आणि नागरिकांना सोयीचे होईल, असे मत कर्मचारी व्यक्‍त करत आहेत. याखेरीज, स्टेडियम समोरील नवीन इमारत किंवा मनपा मुख्य इमारतीतील हॉलचाही विचार केला जात आहे. 

क्रीडा विभागाचे स्थलांतर होणार अथवा नाही, याबाबत काही सांगणे घाईचे ठरेल. परंतु, नवीन जागेचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार नवीन ठिकाणी जागांची चाचपणी केली जात आहे. 
- नितीन कापडणीस, सहाय्यक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका 

Web Title: Sports department re-shift