पिंपळे सौदागरमध्ये साकारणार क्रीडा संकुल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

दृष्टिक्षेपात मैदान

  • छोटे टेनिस कोर्ट - ११-५.५० मीटर
  • छोटे फुटबॉल पीच - ६५- ३५ मीटर
  • क्रिकेट पीच - २२-२० मीटर
  • धावणे मार्ग - २५० मीटर (चार लेन)
  • खुली व्यायामशाळा (ओपन जिम) - दोन हजार चौरस मीटर

इतर सुविधा 

  • एकाचवेळी पन्नास लोकांना बसण्यासाठी आरामदायी बेंचेस
  • पिण्याचे शुद्ध पाणी
  • आठ चौरस फुटाची सुरक्षारक्षक खोली
  • स्वच्छतागृह व कपडे बदलण्यासाठी खोली
  • वैयक्तिक लॉकर्ससाठी सोय

उद्योगनगरी नव्हे; क्रीडानगरी 
पिंपळे सौदागर येथील परघळे कॉर्नर येथेही चार हजार चौरस फुटांत नवीन क्रीडा संकुल उभे राहत आहे. यात कबड्डीच्या मैदानाचा समावेश असून, त्यामुळे कबड्डीप्रेमी असलेल्या सौदागरवासीयांची पारंपरिक ओळख टिकणार आहे. लिनियरमुळे उद्याननगरी व आता या मैदानांमुळे क्रीडानगरी म्हणून सौदागरचे नाव उदयाला येत आहे.

नवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील कुणाल रस्त्यावर महापालिकेच्या वतीने क्रीडा संकुलाचे काम सुरू असून, त्यामध्ये येथील जिव्हाळ्याचा खेळ असलेल्या कबड्डी मैदानाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सौदागरवासीयांची कबड्डीची ओळख टिकून राहण्यास मदत होणार आहे; तसेच हे क्रीडा संकुल शहराच्या सौंदर्यात भर घालणारे ठरणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पूर्वीच्या काळात पिंपळे सौदागर हे गाव कुस्ती व कबड्डीपटूंचे गाव म्हणून ओळखले जात होते; परंतु महापालिकेच्या नियोजनबद्ध विकासामुळे गावाचे रूपांतर मोठ्या उपनगरात झाले. टोलेजंग इमारती, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, मल्टीप्लेक्‍स, रुंद रस्ते व तब्बल दोन किलोमीटर लांबीचे शिवछत्रपती लिनियर गार्डन यामुळे पिंपळे सौदागर चर्चेत आले.

उच्चशिक्षित आयटीयन्सचा निवासी झोन म्हणून या भागाची सध्याची ओळख आहे. पिंपळे सौदागर येथील आरक्षण क्रमांक ३६७ ‘ए’ या दहा हजार चौरस मीटर जागेवर हे क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे. ‘आरोग्यम धनसंपदा’ हा विचार घेऊन महापालिका येथे साडेसात कोटी रुपये खर्चून क्रीडा संकुल उभारत आहे. एकूण दहा हजार चौरस मीटरपैकी साडेआठ हजार चौरस मीटर जागा ताब्यात आली असून, दीड हजार चौरस मीटर जागा ताब्यात येणे बाकी आहे.

एक वर्षापासून या मैदानाचे काम सुरू असून, पन्नास टक्के काम झाले आहे. उर्वरित कामासाठी आणखी एक वर्षाचा अवधी लागणार आहे. सर्व सुविधांनी सुसज्ज असलेल्या या क्रीडा संकुलाला प्रशस्त वाहनतळही असणार आहे.
- देवण्णा गट्टुवार, कार्यकारी अभियंता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sports Ground in Pimple Saudagar