क्रीडा महोत्‍सवासह स्‍वच्‍छतेेचा जागर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोवर लस देण्यात आली. या वेळी गोवर लसीचा दुष्परिणाम होत नसल्याचे प्रा. सतीश गवळी यांनी पटवून दिले. या वेळी पर्यवेक्षिका सुमती पाटसकर, राजीव कुटे, गंगाधर सोनवणे, शिवाजी अंबिके उपस्थित होते. उपकार्यवाह शरद इनामदार, प्रा. जोत्स्ना एकबोटे, डॉ. गजानन एकबोटे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कूलमध्ये पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे गोवर लस देण्यात आली. या वेळी गोवर लसीचा दुष्परिणाम होत नसल्याचे प्रा. सतीश गवळी यांनी पटवून दिले. या वेळी पर्यवेक्षिका सुमती पाटसकर, राजीव कुटे, गंगाधर सोनवणे, शिवाजी अंबिके उपस्थित होते. उपकार्यवाह शरद इनामदार, प्रा. जोत्स्ना एकबोटे, डॉ. गजानन एकबोटे यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

कन्या विद्यालयास मशिन भेट
विद्यार्थिनींचे उत्तम आरोग्य व स्वच्छता याची गरज ओळखून ‘सुवानीती मंच’तर्फे पिंपरीगावातील रयत शिक्षण संस्थेच्या कन्या विद्यालयास सॅनिटरी नॅपकिन्स डिस्पोजेबल मशिन भेट दिले. मंचाचे संस्थापक भूषण कटककर व मुक्ता भुजबले यांनी हे मशिन सुपूर्त केले. मुख्याध्यापिका एस. जाधव, पर्यवेक्षिका एस. पडवळ, उपशिक्षिका एस. व्ही. निकम उपस्थित होत्या. 

कन्या विद्यालयात बक्षीस वितरण 
रयत गुरुकुल प्रकल्प आणि शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून कन्या विद्यालयात बक्षीस वितरण झाले. या वेळी कैलास थोपटे, उद्योजक नवनाथ जाचक उपस्थित होते. कला, क्रीडा व सहशालेय स्पर्धांमध्ये यशस्वी मिळविलेल्या विद्यार्थिनींना प्रशस्तिपत्र व पुस्तक बक्षीस दिले. संदीप साकोरे यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षिका पडवळ यांनी आभार मानले.

क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन
चिंचवड येथील सौ. ताराबाई शंकरलाल मुथा कन्या प्रशालेत क्रीडा महोत्सवाचे उद्‌घाटन छत्रपती पुरस्कार विजेत्या व राष्ट्रीय खेळाडू रेखा राका आणि भारत केसरी विजय गावडे यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून खेळाडूंचा शपथविधी घेण्यात आला. या वेळी सचिव राजेंद्र मुथा व सहायक सचिव अनिल कांकरिया उपस्थित होते. विद्यार्थिनी ‘शिकाई मार्शल’ विजेती सानिया शेख हिचा सत्कार करण्यात आला. या वेळी राका यांनी खेळाचे महत्त्व पटवून दिले. प्रा. श्रद्धा जैन, शमा राका, हंसा लोहार, बनसोडे यांचे स्पर्धेसाठी सहकार्य लाभले.

कन्या विद्यालयात स्वच्छता
किर्लोस्कर फाउंडेशनतर्फे ‘किर्लोस्कर वॉश’ उपक्रमांतर्गत कन्या विद्यालयात परिसर स्वच्छता व कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला. ‘आजार टाळूया  निरोगी राहूया’, असा संदेश देण्यात आला. ‘घनकचऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे’ याविषयी फिसरेकर यांनी पालकांना मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका पडवळ उपस्थित होत्या.

मॉडर्नमध्ये क्रीडा महोत्सव 
निगडी येथील यमुनानगरमधील मॉडर्न हायस्कूल, प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक इंग्रजी माध्यम विभागाच्या वार्षिक क्रीडा महोत्सव पार पडला. महोत्सवाचे उद्‌घाटन गिर्यारोहक कृष्णा ढोकळे यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्योत्स्ना एकबोटे, डॉ. गजानन एकबोटे, शरद इनामदार, राजीव कुटे, मुख्याध्यापिका संगीता घुले, मुख्याध्यापक पांडुरंग मराडे, मुख्याध्यापिका गौरी सावंत, तृप्ती वंजारी, धनश्री कुलकर्णी, ज्योती जाधव, गंगाधर सोनवणे उपस्थित होते. दीपाली वायकोळे यांनी प्रास्ताविक केले. शीतल कोरड यांनी सूत्रसंचालन केले. मधुकर रासकर, ज्ञाती चौधरी यांनी संयोजन केले. 

जैन महाविद्यालयात युवा सप्ताह
युवा सप्ताहानिमित्त श्री फत्तेचंद जैन कनिष्ठ महाविद्यालयात नृत्य, गायन, वादन, मेहंदी व प्रश्नमंजूषा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. उपमुख्याध्यपिका चंदा बोरा व पर्यवेक्षिका मनीषा जैन यांनी उद्‌घाटन केले. 
१३८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत भाग घेतला. मेहंदी स्पर्धेत चकोर दिव्या, प्रश्नमंजूषा स्पर्धेत मृणाल चौधरी तर गायन स्पर्धेत संध्या तिवारी, वादन स्पर्धेत अजय वाघिरे याने प्रथम क्रमांक पटकाविला. राजेंद्र मुथा, अनिल कांकरिया यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. प्रा. प्रिया शहा व प्रा. सुचिता पाटील यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले.

Web Title: Sports mahotsav Cleaning Campaign