#SPPU जड वाहनांना विद्यापीठाच्या जोशी गेटचा वापर करावा लागणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 एप्रिल 2019

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील वाहनांचा ताण कमी करण्यासाठी विद्यापीठात येणाऱ्या जड वाहनांना खडकी स्टेशनकडील जोशी गेटनेच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, जोशी गेटने येणाऱ्या वाहनचालकांना बायोमेट्रिक तपासणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील वाहनांचा ताण कमी करण्यासाठी विद्यापीठात येणाऱ्या जड वाहनांना खडकी स्टेशनकडील जोशी गेटनेच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच, जोशी गेटने येणाऱ्या वाहनचालकांना बायोमेट्रिक तपासणी करूनच प्रवेश दिला जाणार आहे.

विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे. मुख्य प्रवेशद्वार मुख्य चौकात तिथे वाहतुकीचा ताण वाढतो. तसेच, या प्रवेशद्वाराने विद्यापीठात येणारी जड वाहने व कंत्राटदारांची वाहने यांची नोंद करणे व त्यांना गेट पास देणे शक्य होत नाही. या कारणांमुळे आता विद्यापीठात येणाऱ्या जड वाहनांना जोशी गेटने (खडकी स्टेशनकडून विद्यापीठात येताना वापरले जाणारे प्रवेशद्वार) प्रवेश दिला जाणार आहे. त्या ठिकाणी या  वाहनांची नोंद करणे आणि त्यांना गेट पास देणे शक्य होईल. असे करताना वाहतुकीचा खोळंबा होणार नाही. ही व्यवस्था पुढील महिन्याभरात अंमलात येईल, अशी माहिती विद्यापीठाचे सुरक्षा संचालक सुरेश भोसले यांनी दिली.

बायोमेट्रिक तपासणी
याचबरोबर जोशी गेटमधून आत येण्यासाठीसुद्धा आता बायोमेट्रिक तपासणी करूनच प्रवेश देण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. यापूर्वी आयुका गेटकडून येणाऱ्या वाहनचालकांना बायोमेट्रिक तपासणी करूनच प्रवेश देणे सुरू करण्यात आले आहे. आता जोशी गेटने येणाऱ्यांनाही अशाच पद्धतीने प्रवेश दिला जाईल. विद्यापीठाशी संबंधित असलेल्या व्यक्तिंनाच असा प्रवेश दिला जाणार आहे. सुरक्षेच्या आणि वाहतुकीच्या कारणास्तव हे निर्णय घेण्यात आले आहेत, असेही भोसले यांनी सांगितले.

Web Title: #SPPU heavy vehicles will have to use Joshi's gate of the university