SPPU : रद्द झालेल्या नियुक्त्या, लांबलेले शैक्षणिक वेळापत्रक, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची रखडलेली अंमलबजावणी आणि...

पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशास लवकरच सुरवात होणार आहे. मात्र, यंदा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावे लागणार आहेत. परंतु, त्या संदर्भातील...
SPPU university
SPPU universityesakal

SPPU - नवीन शैक्षणिक वर्षाच्या ऐन तोंडावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर आव्हानांचा डोंगर उभा राहील आहे. अभ्यासमंडळावरील रद्द झालेल्या नियुक्त्या, लांबलेले शैक्षणिक वेळापत्रक, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची रखडलेली अंमलबजावणी आणि विलंबाने होणारी कुलगुरूंची निवड विद्यापीठासाठी अडचणीत अधिकच भर पाडत असून, अंमलबजावणीतील स्पष्टता न आल्याने महाविद्यालयेही संभ्रमात आहे.

पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशास लवकरच सुरवात होणार आहे. मात्र, यंदा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावे लागणार आहेत. परंतु, त्या संदर्भातील अभ्यासक्रम आराखडा व विषय निहाय अभ्यासक्रम अद्याप विद्यापीठाने तयारच केले नसल्याने संलग्न महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश कसा द्यायचा? असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. त्यात बहुतेक महाविद्यालये ही नॅकच्या मुल्यांकनामध्ये व्यस्त असून, विद्यापीठाकडून वेळीच स्पष्टता येत नसल्याने अडचणींत वाढच होत असल्याचे मत प्रचार्यांनी व्यक्त केले आहे.

नव्या अभ्यासक्रमासाठी वेगवान हालचाल -

विद्यापीठाच्या विविध अभ्यास मंडळातील अपात्र सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी अभ्यासक्रम आराखडा तयार नसल्याचे समोर आले. परंतु, आता विद्यापीठ प्रशासनातर्फे युद्ध पातळीवर अभ्यासक्रम आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच पुढील पंधरा ते वीस दिवसांच्या कालावधीत प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम तयार करण्याबाबत वेगवान हालचाली कराव्या लागणार आहेत.

महाविद्यालयासमोरील प्रश्न...

  • - नवीन शैक्षणिक धोरणासंबंधी नक्की काय करायचे, या बद्दलच अनभिज्ञता

  • - प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तीन व चार वर्षांचा अभ्यासक्रमा संदर्भात निश्चितता नाही

  • - विद्यार्थ्यांनी विषयांची निवड कशी करावी, शुल्क कसे आकारावे

  • - बारावीच्या मूळ गुणपत्रिका प्राप्त झाल्यानंतर प्रथम वर्षाचे प्रवेश कसे करावे

  • - वैकल्पिक विषय आणि कार्यानूभवासाठीच्या श्रेयांकांबद्दल निश्चितता नाही

  • - प्राध्यापकांचा वर्कलोडच्या विभागणीची स्पष्टता नाही

SPPU university
Mumbai Crime: दारूमुळे झाला कर्जबाजारी, मग कर्ज फेडण्यासाठी थेट डॉमिनोजमध्ये चोरी

नव्या शैक्षणिक धोरणानुसार सर्व अभ्यासक्रमांचा आराखडा पूर्ण झाला आहे. लवकरच या संदर्भात कुलगुरूंची प्राचार्यांबरोबर बैठक होईल. त्यांना विश्वासात घेऊनच पुढील अंलबजावणी करण्यात येईल. अभ्यासमंडळाच्या नियुक्त्यांनतर तातडीने सर्व विषयांचा अभ्यासक्रम तयार केले जातील. पहिल्या वर्षाचा अभ्यासक्रम महाविद्यालय सुरू होण्याच्या आत विद्यार्थ्यांकडे असेल.

डॉ. मनोहर चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com